Rajnath Singh 
देश

Manipur Violence: मैतेई अन् कुकी समाजाला थेट आवाहन; हिंसाचारावर राजनाथ सिंहांनी काढला तोडगा!

मणिपूरमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून अद्यापही हिंसाचार सुरुच आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून अद्यापही हिंसाचार सुरुच आहे. तेंगनोपल जिल्ह्यात झालेल्या एका स्फोटात अनेक पोलीस कमांडो जखमी झाले आहेत. तत्पूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.

यापार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मैतेई आणि कुकी समाजाला त्यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. (Rajnath Singh appeals to Meitei and Kuki communities in Manipur to sit together and end trust deficit)

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या

मंगळवारी सकाळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सीमाभागातील या शहरात हिंसाचारावर नियंत्रणासाठी मणिपूर पोलिसांच्या कमांडोंना पाचारण करण्यात आलं होतं. या कमांडोंच्या टीमच्या मार्गात स्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

कुकींचा गंभीर आरोप

दरम्यान, कुकी समाजाच्या गटानं आरोप केला की, पोलीस कमांडोंनी आधी अंदाधुंद बळाचा वापर केला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्या स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण यावर एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, इथले बंडखोर गट काहीही दावा करतात. म्हणजेच ते सांगतात ते खरंच आहे असं समजता कामा नये. उलट त्यांच्या दाव्याची पडताळणी केली पाहिजे. (Marathi Tajya Batmya)

राजनाथ सिंहांनी काढला तोडगा

दरम्यान, या परिस्थितीवर तोडग्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेवटचा तोडगा म्हणून दोन्ही समाजांना थेट आवाहन केलं आहे. मैतेई आणि कुकी समाजानं एकत्र बसावं आणि थेट मनापासून एकमेकांशी संवाद साधावा आणि परस्परांमधील अविश्वासाचं वातावरण संपवावं, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत नोटिसीला केंद्र सरकारचं उत्तर; हायकोर्टानं याचिका काढली निकाली

Nagothane Flyover Cracks : उड्डाणपुलावर 60 दिवसांत चार ते सहा इंच रुंदीच्या 50 मीटर लांबीच्या भेगा, वाहतूक केली बंद

Viral Video : भाजप नेत्याचा भर रस्त्यात फोनवर बोलता बोलता मृत्यू; हार्ट अटॅक येताच खाली कोसळले अन्... CCTV मध्ये कैद थरारक घटना

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्यूनिंग वहिनींसोबतही आहे - सुनील तटकरे

Pune News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! वनजमिनीवरील पिकांची स्वतंत्र नोंद; वनहक्कधारकांना मिळणार सुधारित सातबारा

SCROLL FOR NEXT