rajya sabha election 2022 result bjp won 3 seats in karnataka congress won 1 seat  
देश

कर्नाटकातून भाजपसाठी आनंदाची बातमी; तीन जागांवर विजय

सकाळ डिजिटल टीम

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या निकालात कर्नाटकमधून भाजपसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाने (BJP) 3 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने 1 जागा जिंकली आहे. दुसरीकडे, जेडीएसच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. (rajya sabha election 2022 result bjp won 3 seats in karnataka congress won 1 seat)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, लहारसिंग सिरोया आणि अभिनेता जग्गेश आता कर्नाटकातून भाजपचे राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्याचवेळी जयराम रमेश यांना राज्यसभेवर पाठवण्यात काँग्रेसला यश आले आहे. आज कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान पार पडले.

काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मन्सूर अली खान यांना उमेदवारी दिली होती. जनता दल (सेक्यूलर) कडून राज्यसभेत पोहोचण्याच्या शर्यतीत कुपेंद्र रेड्डी सहभागी झाले होते. राज्यातून राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी सिरोया, खान आणि रेड्डी यांच्यात थेट लढत होईल असा अंदाज व्यक्त होत होता. जेडीयू (सेक्यूलर) ने गुरुवारी रात्री आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले होते. तर त्यांचे कोलारचे आमदार श्रीनिवास रेड्डी यांनी यापूर्वीच काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचे जाहीर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

11 Fours, 2 Sixes... रिंकू सिंगचं सलग दुसरं शतक! आता तरी टीम इंडियात पुन्हा जागा मिळणार का?

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

SCROLL FOR NEXT