गेहेलोत यांनी सूत्र फिरवली, राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठं यश

काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय असल्याचे मत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केले आहे.
Rajasthan Rajyasabha
Rajasthan RajyasabhaSakal

जयपूर : देशातील चार राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर आता राजस्थामधून मतमोजणीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने (Congress) तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाने (BJP) एक जागा जिंकली आहे. या विजयानंतर काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी हे तिघेही राज्यसभेवर पोहचले आहेत. तर भाजपाचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. (Rajasthan Rajya sabha Election Result News)

राज्यसभा निवडणुकीत रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांना 43 मते मिळाली, तर मुकुल वासनिक (Mukul Waknis) यांना 42 मते मिळाली. वासनिक यांच्या खात्यावरील एक मत फेटाळण्यात आले आहे. घनश्याम तिवारी (Ghanashyam Tiwar) यांना 43 मते मिळाली. प्रमोद तिवारी यांना 41 मते मिळाली असून, डॉ.सुभाष चंद्र यांच्या खात्यात केवळ 30 मते आली. निवडणुकीत तीन जागा जिंकल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

Rajasthan Rajyasabha
...म्हणून राणा अन् मुनगंटीवारांचे मत बाद करा; शिवसेनेची मागणी

हा लोकशाहीची विजय

दरम्यान, राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांवर काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय असल्याचे मत मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Ghehlot) यांनी निकालानंतर व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी तिनही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत तिन्ही खासदार दिल्लीत राजस्थानच्या हक्कांबाबत काम करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com