Ram temple 
देश

Ram temple: 22 जानेवारीला 1 ट्रिलियन आर्थिक उलाढाल अपेक्षित; राम मंदिरामुळे व्यवसायाला चालना!

२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या दिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये उत्साह आहे. देशाच्या विविध भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या दिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये उत्साह आहे. देशाच्या विविध भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. २२ जानेवारी रोजी १ ट्रिलियन रुपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती ट्रेंडर्स संघटनेनी दिली आहे.

ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडेरेशनने यासंदर्भात काही अंदाज बांधले आहेत. विविध राज्यातील तीस शहरांमधून ट्रेंड संघटनेच्या माहितीच्या अधारे या दिवशी १ ट्रिलियन रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Ram temple consecration to generate Rs 1 trillion worth of business CAIT )

22 जानेवारीचा उत्सव केवळ धार्मिक भावना जागवणारा नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडींना चालना मिळेल. विश्वास आणि श्रद्धा यामुळे अनेक लोकांनी जुन्या पद्धतीनुसार नवे व्यवसाय सुरु करण्याला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे, असं CAIT चे राष्ट्रीय सचिव प्रविन खांडेवाल म्हणाले.

खांडेवाल यांनी सांगितलं की, २२ जानेवारीला देशभरात ३० हजार वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन ट्रेंड असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राम मंदिराचे उद्घाटन लक्षात घेऊन या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

२२ जानेवारी रोजी श्री राम पद यात्रा, श्रीराम स्कूटर, कार यात्रा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. राम मंदिर आणि प्रभू राम यांच्याशी निगडीत अनेक वस्तू बाजारात आल्या आहेत. श्रीराम असलेले झेंडे, बॅनर, टोप्या, शर्ट, कुर्ता, फोटो फ्रेम यांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे.

राम मंदिर आणि प्रभू रामाच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. दाव्यानुसार, २२ जानेवारीपर्यंत तब्बल ५ कोटी मूर्ती विकल्या जाणार आहेत. त्यासाठी देशभरातील छोटे उत्पादक मूर्ती घडवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. देशभरातील विविध शहरांमधून हे काम सुरु आहे.

पुढील आठवण्यात दिल्लीतील २०० पेक्षा जास्त मोठे मार्केट आणि अनेक छोट्या मार्केटमध्ये श्रीरामाचे झेंडे आणि इतर संबंधित वस्तू विकायला येतील. तसेच दिल्लीच्या मार्केटमध्ये पारंपरिक कार्यक्रमासाठी वृंदावन आणि जयपूरवरुन लोक नर्तक आणि गायक यांना बोलवण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT