Lok Sabha Election Funny Candidate Esakal
देश

Lok Sabha Election: ऐकावं ते नवलच! उमेदवारानं प्रचारासाठी हाती घेतला वस्तरा! म्हणाला, दाढी करतो मत द्या...

Lok Sabha Election: देशात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशातील सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. मोठे राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी काढतात.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Lok Sabha Election: देशात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशातील सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. मोठे राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी काढतात. अनेक बडे नेते, अभिनेते उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येतात. मात्र, या निवडणुकीची धामधूमीत एका अपक्ष उमेदवारांचा स्व:ताचा प्रचार करतानाचा व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रचारादरम्यान त्याने हातात वस्तारा घेत मतदाराची दाढी करण्यास सुरूवात केली. निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराने एका सलूनला भेट दिली. सलूनमध्ये शिरताच या उमेदवारानं हातात थेट वस्तारा घेतला, आणि दाढी करण्यास सुरूवात केली. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

तमिळनाडू येथील रामेश्वरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उभा असलेला अपक्ष उमेदवार एका सलूनमध्ये जातो आणि तिथे लोकांचे केस कापून देतो आणि दाढी करून देतो. एएनआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा अपक्ष उमेदवार सलूनमधील मतदारांना हात जोडून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अपक्ष उमेदवाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 180.9k अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मिडीया युजर मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक युक्त्या वापरतात. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ समोर येत असतात. या दरम्यान हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SCROLL FOR NEXT