Cancer Therapy : राष्ट्रपतींनी लाँच केली स्वदेशी CAR-T सेल थेरपी, आता कर्करोगावरील उपचार होणार सुलभ

Cancer Therapy : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी कर्करोग या गंभीर आजारावरील उपचारांसाठी फायदेशीर असणारी पहिली स्वदेशी CAR –T Cell थेरपी लाँच केली.
 Cancer Therapy
Cancer Therapyesakal

Cancer Therapy : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी कर्करोग या गंभीर आजारावरील उपचारांसाठी फायदेशीर असणारी पहिली स्वदेशी CAR –T Cell थेरपी मुंबईतल्या आयआयटी बाँम्बेमध्ये लाँच केली. जनुकांवर आधारित असलेल्या या थेरपीमुळे रक्ताच्या कर्करोगासह विविध कर्करोगांवर उपचार करण्यास मदत होणार आहे.

या थेरपीमुळे भारतातील अनेक रूग्णांचा जीव वाचवण्यास मदत होऊ शकणार आहे. कर्करोगाविरूद्धच्या लढाईतील ही मोठी झेप असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.

ही थेरपी लाँच केल्यानंतर कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, कर्करोगाची ही स्वदेशी विकसित थेरपी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाचे उदाहरण आहे. ही थेरपी वैद्यकीय शास्त्रातील अभूतपूर्व प्रगती मानली जात आहे. त्या पुढे म्हणाल्या की, ही थेरपी कर्करोगाविरूद्धच्या लढ्यातील मोठे यश आहे. ही CAR-T सेल थेरपी सुलभ आणि परवडणारी आहे. संपूर्ण मानवजातीसाठी ही एक नवीन आशा प्रदान करते.

 Cancer Therapy
Cancer Treatment: कर्करोग उपचारांचे दुष्परिणाम कमी करणाऱ्या औषधाचा शोध; टाटा इन्स्टिट्यूटला मोठं यश! किंमत फक्त...

काय आहे CAR-T सेल थेरपी?

कर्करोगावरील या प्रभावी CAR-T सेल थेरपीमध्ये रूग्णाच्या टी पेशी (रोगप्रतिकारक प्रणाली पेशीचा एक प्रकार) बदलण्याचा समावेश असतो. या खास तयार केलेल्या टी-सेल्स कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करण्याचे काम करतात. यामुळे, कर्करोगावरील उपचार आणखी सुलभ होणार आहेत. या थेरपीतील टी-सेल्स तयार करण्यासाठी जटिल अनुवांशिक अभियांत्रिकी आवश्यक आहे.

कुणी विकसित केली ही थेरपी?

कर्करोगावर प्रभावी ठरणारी ही CAR-T सेल थेरपी इंडियन इन्स्टिटूयट ऑफ टॅक्नोलॉजी (IIT) बाँम्बे आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांनी विकसित केली आहे. विशेष म्हणजे NexCAR19 CAR टी-सेल ही थेरपी भारतातील पहिली मेड इन इंडिया CAR टी-सेल थेरपी आहे.

ही थेरपी कर्करोगावरील उपचारांचा खर्च कमी करण्यास मदत करेल. या कार्यक्रमात बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, परदेशात या थेरपीच्या किंमतीच्या तुलनेत भारतातील या थेरपीची किंमत केवळ १०% टक्के असेल. ज्यामुळे, कर्करोगावरील उपचारांच्या खर्चात लक्षणीय घट होईल, अशी अपेक्षा आहे.

 Cancer Therapy
Cancer Free : स्वदेशी CAR-T सेल थेरपीमुळे कर्करोगमुक्त झाला भारतातील पहिला रूग्ण, उपचारांचा खर्च ४ कोटींवरून आला ४० लाखांवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com