Nitish Kumar esakal
देश

'या जन्मातच काय, तर पुढच्या सात जन्मातही नितीश कुमार पंतप्रधान होऊ शकणार नाहीत'

'जेडीयू हे बुडणारं जहाज आहे. आता या पक्षात काहीच उरलं नाहीय.'

सकाळ डिजिटल टीम

'जेडीयू हे बुडणारं जहाज आहे. आता या पक्षात काहीच उरलं नाहीय.'

माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह (RCP Singh) यांनी जनता दलाचा राजीनामा देताना मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. माध्यमांशी बोलताना आरसीपी यांनी सांगितलं की, नितीश कुमार सात जन्मातही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. जेडीयू (JDU) हे बुडणारं जहाज आहे. आता या पक्षात काहीच उरलं नाहीय, असा टोला त्यांनी लगावलाय.

जेडीयूनं आरसीपी सिंग यांच्यावर प्रचंड संपत्ती गोळा केल्याचा आरोप करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर, शनिवारी संध्याकाळी आरसीपी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आरसीपी सिंह यांनी जेडीयू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केलीय.

Nitish Kumar vs RCP Singh

एका पत्रकारानं त्यांना नितीश कुमार पंतप्रधान होण्याबाबत प्रश्न विचारला असता, ते चांगलेच संतापले. आरसीपी म्हणाले, नितीश कुमार या जन्मातच काय, तर पुढच्या सात जन्मातही ते पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. जेडीयूनं राजकारणाची पातळी कमी केलीय. हे एक बुडणारं जहाज आहे. आता जेडीयूमध्ये काय उरलंय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले आरसीपी सिंह आणि पक्ष हायकमांड यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या शिवाय, त्यांचा पाटण्यातील सरकारी बंगलाही नितीश सरकारनं हिसकावून घेतला होता. यानंतर आरसीपींच्या जवळच्या काही नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरसीपी सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, भाजप आणि आरसीपींनी ती चर्चा फेटाळून लावलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT