..म्हणून बलात्कारानंतर खुनाच्या घटनांत वाढ; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानं खळबळ

मुख्यमंत्री गेहलोत यांनी बलात्कारासंदर्भात केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय बनलंय.
Rajasthan CM Ashok Gehlot
Rajasthan CM Ashok Gehlotesakal
Summary

मुख्यमंत्री गेहलोत यांनी बलात्कारासंदर्भात केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय बनलंय.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी बलात्कारासंदर्भात केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय बनलंय. निर्भया प्रकरणानंतर (Nirbhaya Case) दोषींना फाशी देण्याचा कायदा आला, त्यामुळं बलात्कारानंतर हत्येच्या घटनांमध्ये वाढ झालीय. देशात दिसणारा हा धोकादायक ट्रेंड चिंतेचा विषय असल्याचं गेहलोत म्हणाले.

सीएम गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर भाजप (BJP) नेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवण्यास सुरुवात केलीय. गेहलोत यांच्या विधानाचा संदर्भ देत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद जयहिंद (Shehzad Jai Hind) यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. शहजाद म्हणाले, 'गेहलोत यांनी बलात्कार करणाऱ्यांना दोषी ठरवलं नाही, तर बलात्काराच्या कठोर कायद्यांना दोषी ठरवलंय. निर्भयानंतर कायदा कडक केल्यामुळं बलात्काराशी संबंधित खून वाढले, अशा प्रकारचं हे पहिलं विधान नाहीय.'

Rajasthan CM Ashok Gehlot
हेड कॉन्स्टेबलनं CISF जवानांवर झाडल्या गोळ्या; एक ठार तर दुसरा जवान जखमी

शहजाद पुढं म्हणाले, 'बलात्काराच्या बहुतांश घटना खोट्या असल्याचंही गेहलोत यांनी म्हटलंय. त्यांचे मंत्री म्हणतात की, ही मृतांची भूमी आहे म्हणूनच बलात्कार होतात; पण प्रियंकाजी यावर गप्प आहेत. महिला अत्याचाराच्या बाबतीत राजस्थान अव्वल असूनही प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) का गप्प आहेत?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.'

Rajasthan CM Ashok Gehlot
..म्हणून शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र ठरतील; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

बलात्कार प्रकरणात राजस्थान अव्वल?

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अहवालानुसार, राजस्थानात 2020 मध्ये 5,310 बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर NCRB च्या म्हणण्यानुसार, याच्या फक्त एक वर्ष आधी (2019) इथं बलात्काराच्या 5,997 केसेस झाल्या होत्या. या दोन्ही वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये राजस्थान देशात पहिल्या क्रमांकावर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com