Republic Day Air Force Show eSakal
देश

Republic Day 2024 : प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुण्यांसमोर होणार लढाऊ विमानांचं थरारक प्रात्यक्षिक; कोणकोणती विमानं असणार?

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये वायुसेनेच्या मार्चिंग दलाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे आहे. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे या सोहळ्याला उपस्थित असतील.

Sudesh

Republic Day Air Show : देशाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला अवघे काही तासच शिल्लक आहेत. या सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे या सोहळ्याला उपस्थित असतील. त्यांच्यासमोर प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील इतर कार्यक्रमांसोबतच भारतीय हवाई दलाचं थरारक प्रात्यक्षिक देखील सादर होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये वायुसेनेच्या मार्चिंग दलाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे आहे. स्क्वॉड्रन लीडर रश्मी ठाकूर, सुमिता यादव, प्रतीति अलहुवालिया आणि फ्लाईट लेफ्टनंट कीर्ती रोहिल या मार्चिंग दलाचे नेतृत्त्व करतील. या ग्रुपमध्ये 144 हवाई योद्धे सहभागी होतील.

कोणत्या विमानांचा समावेश?

या सोहळ्याला हवाई दलाची 51 विमानं प्रात्यक्षिक करणार आहेत. यामध्ये 29 लढाऊ विमानं, आठ मालवाहू विमानं, 13 हेलिकॉप्टर आणि एक वारसा विमान सहभागी असणार आहेत. यात सुखोई-30, जॅग्वार, सी-130 आणि तेजस या विमानांचा सहभाग असेल. यावेळी विविध प्रकारची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात येतील.

मॅक्रॉन यांचा दोन दिवसीय दौरा

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मॅक्रॉन हे आज (25 जानेवारी) दुपारीच भारतात दाखल होतील. 2.30 वाजेच्या सुमारास ते जयपूर एअरपोर्टवर उतरतील. त्यानंतर ते जयपूरमध्येच थांबणार आहेत. सायंकाळी 5:30 वाजता पंतप्रधान मोदी त्यांचं औपचारिक स्वागत करतील. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. रात्री 8.50 च्या सुमारास ते दिल्लीला रवाना होतील. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन परेडनंतर ते फ्रान्सला परतणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना दिले जाणारे सर्व उपचार त्यांच्या संमतीनेच केले जात आहेत - मेदान्ता रुग्णालय

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT