PMC-Bank Google
देश

आरबीआयने पीएमसी बँकेवरील निर्बंध वाढवले ​​

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने शुक्रवारी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC Bank) वरील निर्बंध 1 जुलै 2021 पासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविले आहेत. पीएमसी बँकेच्या पुनर्रचनेसाठी (reconstruction) वेळ लागेल ही बाब लक्षात घेऊन हे निर्बंध वाढवण्यात आल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. (reserve-bank-extends-restrictions-on-pmc-bank)

सेन्ट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (CFSL) आणि रेझिलिएंट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड (BharatPe) कडून देण्यात आलेल्य प्रस्तावावर काळजीपुर्वक विचार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे RBI ने सांगीतले. पीएमसी बँकेच्या पुनर्रचना प्रक्रियेतील सर्व घटकांचा विचार केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन निर्बंध वाढविणे आवश्यक असल्याचे आरबीआयकडून ठरविण्यात आले.

पीएमसी बँकेवर लावण्यात आलेले हे निर्बंध 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यत वाढवण्यातआले आहेत. दरम्यान गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँक ताब्यात घेण्याच्या डेकची मंजुरी नॉन-बँक लेंडर सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस आणि फिनटेक स्टार्टअप भारतपे या कन्सोर्टियमद्वारे दिली. तसेच ऑन-टॅप लायसेन्स देण्याच्या नियमांतर्गत लहान वित्त बँक स्थापन करण्यासाठी केंद्राला तात्विक मान्यता देण्यात आली आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये आरबीआयने घोटाळ्याच्या चोकशी दरम्यान पीएमसी बँकेवर अनेक कठोर निर्बंध लावले होते. यामध्ये बँकेतून रोख रक्कम काढण्यास देखील निर्बंध घालण्य़ात आले होते. सुरुवातीला रोख रक्कम काढण्यासाठी 1,000 रुपये प्रति खाते प्रत्येक सहा महिने असा नियम ठेवण्यात आला होता, तो गेल्या वर्षी जून महिन्यात शिथिल करुन 100,000 रुपये करण्यात आला.

(reserve-bank-extends-restrictions-on-pmc-bank)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT