
पुणे - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) (RBI) नुकतेच ‘सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ला लघु वित्त बँक (एसएफबी) (SFB) स्थापन करण्यासंदर्भात तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुळे पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बॅंक (पीएमसी) (PMC) ताब्यात घेण्याचा मार्ग सुकर होणार आहे. (Reserve Bank Allows Conversion of PMC into Commercial Bank)
बँकिंग नियमन कायद्यानुसार रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या आवश्यक अटींचे पालन केल्यास ‘सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ला बँकिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना देण्यावर विचार करण्यात येईल. ५ डिसेंबर २०१९च्या ‘खासगी क्षेत्रातील लघु वित्तीय बँकांना परवाना’ देण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनांनुसार ही मंजुरी दिल्याचे ‘आरबीआय’ने म्हटले आहे.पीएमसी बँकेने त्यांच्या पुनर्बांधणीसाठी काही गुंतवणूकदारांकडून प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, बँकेची आर्थिक स्थिती पाहता ही प्रक्रिया गुंतागुंतीची असून, आणखी काही काळ लागण्याची शक्यता आहे. बॅंकेचे विलीनीकरण झाल्यास ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. मात्र, व्यवहार्यता सुनिश्चित न झाल्यामुळे ठेवी कोणत्या अटी-शर्तींवर मिळतील, हे अद्याप स्पष्ट नाही.
लघु वित्त बॅंक स्थापन झाल्यास त्यात पीएमसी बॅंकेचे व्यापारी बॅंकेत रूपांतर करण्यात येईल. अडचणीतील सहकारी बॅंकांना हाच नियम लावून उद्योजक आणि कॉपोरेट हाउसेसना मागील दरवाजाने बॅंकिंग परवाना मिळेल. भविष्यात हाच नियम रुपी सहकारी बॅंकेसह इतर अडचणींमधील बॅंकांनाही लावला जाण्याची शक्यता आहे.
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य अर्बन को-ऑप बॅंक्स फेडरेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.