Rishi Sunak Indian descent UK Prime minister Rishi Sunak Indian descent UK Prime minister
देश

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव यूकेच्या पंतप्रधानपदासाठी चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी ब्रिटनचे (UK) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता नवा पंतप्रधान कोण असेल? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यात भारतीय वंशाचे ऋषी सुनक (४२) यांचेही नाव आहे. तसे झाल्यास ऋषी (Rishi Sunak) हे ब्रिटनचे पंतप्रधान होणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती असतील.

ऋषी सुनक (Rishi Sunak) हे राजकोषाचे कुलपतीपद सांभाळत होते. अलीकडेच ऋषी सुनक आणि ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जावेद यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्यांचा महापूर आला होता. याच्या दबावाखाली जॉन्सन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनचे पंतप्रधान होईपर्यंत बोरिस काळजीवाहू पंतप्रधान राहतील, असे मानले जाते. त्यांचा कार्यभार ऑक्टोबर महिन्यापर्यंत राहणार आहे.

ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचे नाव सध्या ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान म्हणून उदयास येत आहे. त्यांना बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी राजकोषाचे कुलपती म्हणून नियुक्त केले होते. त्यांची नियुक्ती फेब्रुवारी २०२० मध्ये केली होती. बोरिस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता तेव्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचे आजी-आजोबा पंजाबमधून ब्रिटनला (UK) पोहोचले होते. इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना दोन मुली आहेत. कॅलिफोर्नियामध्ये अक्षतासोबत भेट झाली होती. कोरोना काळात व्यापारी व कामगारांना मदत केल्याने त्यांना देशात पसंत केले गेले. कोरोना महामारीच्या काळात अब्जावधी पौंड्सच्या मोठ्या पॅकेजच्या घोषणेनंतर ऋषी सुनक यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली होती.

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल दंड

ऋषी सुनक यांना ‘डिशी’ या टोपण नावाने संबोधले जाते. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर दंडही ठोठावण्यात आला होता. त्यांच्यावर डाऊनिंग स्ट्रीट मेळाव्यात सहभागी झाल्याचा आरोप होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT