President Election : ‘मविआ’मध्ये फूट पडणार? जाणून घ्या कारण...

Presidential Election maha vikas aghadi
Presidential Election maha vikas aghadiPresidential Election maha vikas aghadi

नवी दिल्ली : देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक (Presidential Election) होऊ घातली आहे. विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केले आहे. तर एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांचे खासदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी शिवसेनेला केली आहे. दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) व विरोधक यशवंत सिन्हा यांना मतदान करण्यास सांगत आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार का, असा प्रश्न चर्चेला जात आहे.

शिवसेना आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान झाले. तसेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली. बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या प्रचाराला गती देण्याची चर्चा झाली.

Presidential Election maha vikas aghadi
Cabinet : ३८ जणांना मिळणार स्थान; पहा कोणाला मिळणार किती जागा

बैठकीला काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे भालचंद्र कांगो आणि आरजेडीचे एडी सिंग उपस्थित होते. यशवंत सिन्हा यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे सुधींद्र कुलकर्णीही चर्चेत होते. विशेष म्हणजे ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांच्या निवासस्थानी झाली.

देशासमोरील समस्यांशी लढण्यासाठी आम्ही आमचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे ट्विट शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. प्रसारमाध्यमांच्या वृत्तात पवारांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, ज्येष्ठ नेत्याने प्रचाराच्या रणनीतीची कमान स्वत:च्या हातात घेतली आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाशी हातमिळवणी करू शकतात, असे वृत्त होते. मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. शेवाळे यांनी उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांना इतर खासदारांना मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे निर्देश द्यायला सांगितले. यासंदर्भात शेवाळे यांच्यावतीने पत्रही सादर करण्यात आले आहे.

Presidential Election maha vikas aghadi
टीएमसी नेत्यासह तीन जणांची हत्या; गळाही चिरण्याचा प्रयत्न

१२ खासदार शिंदे गटासोबत?

बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी १२ खासदार लवकरच पक्ष बदलतील असा दावा केला होता. ५५ पैकी ४० आमदार आणि १८ पैकी १२ खासदार आमच्यासोबत आहेत. मी चार खासदारांना भेटलो आहे. २२ माजी आमदारही आमच्यासोबत आहेत, असे जळगावात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले होते.

शिंदे गट दोन्ही काँग्रेसवर नाराज

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर शिंदे गट नाराज आहे. या गटाचे नेतृत्व करणाऱ्या शिंदे यांनी महाविकास आघाडीला अनैसर्गिक असल्याचे म्हटले होते. संजय शिरसाट, महेश शिंदे, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, संदीपानराव भुमरे आदी आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले होते.

समाजवादी आमदार होते तटस्थ

समाजवादी पक्षही मविआचा एक भाग आहे. पक्षाचे आमदार रइस शेख यांनी अलीकडेच युतीचा भाग होणे हा कठीण प्रवास असल्याचे म्हटले होते. तिन्ही पक्षांमध्ये वैचारिक फूट होती. एकत्र येण्यासाठी तयार केलेला कॉमन मिनिमम प्रोग्राम (सीपीएम) हे लोक विसरले. शेख हे भिवंडी पूर्वचे आमदार आहे. बहुमत चाचणीच्या वेळी रइस शेख आणि अबू आझमी तटस्थ राहिले होते. समाजवादी पक्षाने राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com