Road Accident in Telangana Esakal
देश

Road Accident: बंदोबस्तावर तैनात असलेल्या IPS अधिकाऱ्याला मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीने चिरडलं, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Road Accident in Telangana: बंदोबस्तावर तैनात असलेल्या IPS अधिकाऱ्याला मंत्र्यांच्या ताफ्याने चिरडल्याची घटना घडली, याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Road Accident in Telangana: हैदराबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे मंत्र्यांच्या ताफ्याने सहाय्यक पोलिस अधीक्षक (एएसपी) आयपीएस परितोष पंकज यांना चिरडल्याने या घटनेत ते जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस अधीक्षक (एएसपी) बंदोबस्तावर असताना मंत्र्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते जखमी झाले. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, आयपीएस परितोष पंकज, जे भद्राचलमचे एएसपी आहेत, सोमवारी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शहर दौऱ्यादरम्यान बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ही घटना घडली.

राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका कारने त्यांना मागून धडक दिली, त्यानंतर ते खाली पडले. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंकज यांना उपचारांसाठी तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर उपचारासाठी हैदराबादला नेण्यात आले, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

याबाबत माहिती देताना एक अधिकारी म्हणाला, 'ते ठीक आहेत.' त्याच्या डाव्या डोळ्याजवळ फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते आता बरे आहेत. ते हैद्राबाद येथील रुग्णालयात आहे.'' या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मंत्र्यांच्या वाहनांनी प्रवेश केल्यानंतर पंकज हे बॅरिकेड बंद करण्याचे निर्देश देत होते, त्यावेळी मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली.

घटना कशी घडली?

व्हिडिओमध्ये पंकज धावताना दिसत आहे, त्यानंतर ते रस्त्याच्या मधोमध उभे राहिल्याचे दिसते. मागून भरधाव येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. सुदैवाने ते बाजूला पडले आणि गाडीच्या चाकाखाली येण्यापासून वाचले. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस त्यांना वाचवण्यासाठी धावले, त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर पंकजला चांगल्या उपचारासाठी हैदराबादला हलवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT