Robert Vadra Smriti Irani  Sakal
देश

Robert Vadra: 'मणिपूर जळत आहे आणि या मंत्री...', स्मृती इराणींनी लोकसभेत फोटो दाखवल्यानंतर जावई बापू भडकले

अविश्वास प्रस्तावावरील राहुल गांधींच्या भाषणावर स्मृती इराणी यांनी जोरदार प्रहार केला होता.

राहुल शेळके

Robert Vadra Smriti Irani: रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत त्यांचा फोटो दाखवल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. पीटीआयशी बोलताना वाड्रा म्हणाले, मणिपूर जळत आहे. महिलांचे व्हिडीओ येत आहेत आणि या मंत्री (स्मृती इराणी) या घटनांवर बोलण्याऐवजी माझ्याबद्दल बोलत आहेत.

वाड्रा पुढे म्हणाले की, मी स्वतःला संसदेपासून दूर ठेवतो. मी राजकारणाशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर तेव्हाच बोलतो जेव्हा सरकार माझे नाव घेते आणि मी हा लढा सुरूच ठेवणार आहे.

अविश्वास प्रस्तावावरील राहुल गांधींच्या वक्तव्यावर स्मृती इराणी यांनी जोरदार प्रहार केला होता. यावेळी त्यांनी रॉबर्ट वाड्रा आणि गौतम अदानी यांचे फोटो दाखवून राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा साधला.

फोटो दाखवत स्मृती इराणी म्हणाल्या की, "काँग्रेस अदानी अदानी करत आहेत, थोडं आता मलाही बोलायचं आहे. माझ्याकडेही फोटो आहेत. जर अदानी एवढे वाईट असतील तर रॉबर्ट वाड्रा त्यांच्या सोबत काय करत आहेत?"

याला उत्तर देताना वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, "स्मृती इराणी जी, संसदेत माझ्या नावाचा गैरवापर करणे थांबवा. मी तुम्हाला आव्हान देतो, पुरावे सादर करा किंवा तुम्ही खोटे बोलणे थांबवा.

माझ्याकडे बोटे दाखवून तुमचे कारनामे लपून राहणार नाहीत. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाशी संबंधित अनेक वाद आहेत. देशाला तुमच्या गोव्यातील रेस्टॉरंट्सबद्दल जाणून घ्यायचे आहे"

रॉबर्ट वाड्रा इथेच थांबले नाहीत ते पुढे म्हणाले की, "तुमची पदवी आणि शैक्षणिक पात्रता देखील वादात आहे. आधी तुम्ही त्याचे स्पष्टीकरण द्या आणि मग इतरांकडे बोट दाखवा... तुम्ही खरोखर पात्र आहात का, गोवा आणि इतर विषयांवर तुम्ही उत्तर द्याल की नाही याची मी वाट पाहत आहे''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT