Marathi News Update: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
AIIMS Recruitment
AIIMS Recruitment google

'मोदींना श्रेय दिले जाईल म्हणून AIIMSला विरोध', भाजपचा विरोधी पक्षातील नेत्यावर आरोप

भारतीय जनता पक्षाचे नेते सुशील मोदी म्हणाले की, "दरभंगा येथे AIIMS बनवण्यात येऊ नये अशी नितीश कुमारांची इच्छा आहे. कारण जर ते बांधण्यात आलं, तर त्याच श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं जाईल. त्यांना नेहमी वाटत की बिहार विकास योजनांपासून वंचित राहावा."

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, लागोपाठ सुट्ट्या आल्याने वाहतुक कोंडी

लागोपाठ सुट्ट्या आल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर चारचाकी वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली. नवी मुंबईमधील वाशी टोलनाक्यापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची दृष्य समोर येत आहेत. बोरघाटामध्ये संथ गतीने वाहतूक सुरु आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेट झाली नाही, अतुल चोरडियांनी केले स्पष्ट

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. अतुल चोरडियांच्या घरी ही भेट झाल्याच्या वार्ता होत होत्या. पण,अजित पवार आणि शरद पवारांची भेट झालीचं नाही, अशी माहिती अतुल चोरडिया यांनी स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, शरद पवार माझ्या घरी जेवायला आले होते, पण अजित पवार आले नाहीत.

बीएसएफ एकमेव राखीव दल, जे...केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केली स्तुती

बीएसएफवर पाकिस्तान आणि बांगलादेश सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. बीएसएफ दोन्ही सीमांवर चांगलं लक्ष्य ठेवते. सर्व राखील पोलीस दलांमध्ये, बीएसएफ असं एकमेव दल आहे, जे पाणी, जमिन आणि आकाश सुरक्षित ठेवण्याची क्षमता आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा, वाहतूक मंदावली

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. खंडाळा बोरघाटात तब्बल १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

'चांदणी चौकाचे नवीन नाव दोन्ही दादांनी मिळून ठरवावे, मी त्याला मान्यता देईल'- नितीन गडकरी

आता चांदणी चौकाचे नवीन नाव दोन्ही दादांनी म्हणजेच चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी मिळून ठरवावे. मी त्याला मान्यता देईल, असे गडकरी यांनी यावेळी म्हटलं आहे.

देशातून पेट्रोल- डिझेलला हद्दपार करणार - नितीन गडकरी

देशातून पेट्रोल- डिझेलला हद्दपार करणार असून त्याजागी वेगवेगळे पर्याय आणणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

'वाहतूक कोंडीमुळे लोकांना दिवसा चांदण्या दिसतात, म्हणून...', चांदणी चौक नाव का पडलं असावं फडणवीसांनी सांगितला अंदाज

अनेकांना पुण्यातील चौकाला चांदणी चौक असं नाव का पडलं असावं याचा अंदाज अनेक जण वेगवेगळा सांगत असतात, तर आज चांदणी चौकाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला अंदाज सांगितला आहे. यावेळी बोलताना फडणवीस, म्हणाले की 'वाहतूक कोंडीमुळे येथे लोकांना दिवसा चांदण्या दिसतात, म्हणून या चौकाच नाव चांदणी चौक असं पडलं असावं.

एकाच खुर्चीवर दोघांचा डोळा कसा असेल?- अजित पवार 

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा आहे असं म्हणणाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. खुर्ची एकच आहे, मग दोघांचा डोळा कसा असेल असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

अजित पवारांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक

अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी कौतुक केलं आहे. तर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा आहे असं म्हणणाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. खुर्ची एकच आहे, मग दोघांचा डोळा कसा असेल असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

नाराजीनाट्यानंतर मेधा कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित

नाराजी नाट्यानंतर मेधा कुलकर्णी याही व्यासपीठावर दाखल झाल्या आहेत. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या. मात्र आता त्या कार्यक्रमासाठी आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं चांदणी चौकातील पुलाचं लोकार्पण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील पुलाचं लोकार्पण करण्यात आलं आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याला सुरूवात

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याला सुरूवात झाली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित आहेत.

नाराजीनाट्यानंतर मेधा कुलकर्णी चांदणी चौकाच्या कार्यक्रमाला उपस्थित

चांदणी चौक या विषयाचं सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला", अशी खंत काल भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी मेधा कुलकर्णी उपस्थित आहेत.

नितीन गडकरींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी, नेत्यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज काही वेळेतच उद्घाटन पार पडणार आहे. नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी पुणे भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत. माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक धीरज घाटे आदी नेते देखील उपस्थित आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात दाखल

चांदणी चौकातील पुलाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात दाखल झाले आहेत.

CM शिंदे नाराज? चांदणी चौकातील पुलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार? अजितदादांनी केलं स्पष्ट

पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं आज लोकार्पण होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्राला उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नाहीये. त्यामुळे आम्हीच त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. आराम करण्यासाठी ते त्यांच्या मुळगावी गेले असल्याने ते आजच्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. एकनाथ शिंदे हे नाराज नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा कोणीही करु नये, असं अजित पवार म्हणाले आहेत.

 उपमुख्यमंत्री अजित पवार करणार मेट्रोने प्रवास

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आज करणार मेट्रोने प्रवास करणार आहेत. चांदणी चौक उद्घाटन सोहळ्याला अजित पवार मेट्रोने जाणार आहेत. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते वनाज मेट्रो स्टेशनपर्यंत अजित पवार आज मेट्रोने प्रवास करणार आहेत.

चांदणी चौक लोकार्पण समारंभाला CM शिंदेंची दांडी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

 पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे आज केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील काही मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या समारंभाला येणार नसल्याचं वृत्त आहे. यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन, वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com