Delhi Crime News Esakal
देश

Delhi Crime News: 'पश्चाताप नाही, ती मला इग्नोर करायची म्हणून...', नराधम साहिलची दिल्ली पोलिसांसमोर कबुली

वादातून अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून प्रियकराने तिचा खून केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. वादातून अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून प्रियकराने तिचा खून केला आहे. प्रियकराने २० पेक्षा जास्त वेळा चाकून वार करत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मृत मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र या दोघांचे भांडण झाले होते.

दरम्यान अगदी वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. साहिल असं त्या आरोपी तरुणांचं नाव आहे. ही घटना शाहबाज परिसरात घडली आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला बुलंदशहर येथून अटक केली आहे. या आरोपीने जे कृत्य केले त्यांनी देश हादरला आहे. या निर्घृण हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपी साहिलने दिल्ली पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला त्याच्या या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचं देखील त्याने म्हटलं आहे.

साहिलने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या वेळी तो खूप संतापलेला होता. अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तिला साहिलसोबत ब्रेकअप करायचे होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच तिने साहिलपासून दूर व्हायला सुरुवात केली, त्य़ाला हे सहन होत नव्हतं म्हणून त्यांनी रागाच्या भरत ही कृत्य केलं आहे.

मुलीची हत्या केल्यानंतर साहिलने रिठाला परिसरात चाकू फेकल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्रभर झालेल्या चौकशीत साहिलने पोलिसांना सांगितले की, तिच्या हत्येचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही. तिला माझ्यासोबतचे नाते संपवून तिच्या जुन्या प्रियकराकडे जायचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT