Delhi Crime News: ‘त्या’ अल्पवयीन तरुणीच्या अंगावर २१ वार नव्हे तर…; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Crime News

Delhi Crime News: ‘त्या’ अल्पवयीन तरुणीच्या अंगावर २१ वार नव्हे तर…; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. वादातून अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून प्रियकराने तिचा खून केला आहे. प्रियकराने २० पेक्षा जास्त वेळा चाकून वार करत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मृत मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र या दोघांचे भांडण झाले होते.

दरम्यान अगदी वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. साहिल असं त्या आरोपी तरुणांचं नाव आहे. ही घटना शाहबाज परिसरात घडली आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला बुलंदशहर येथून अटक केली आहे.

शवविच्छेदन अहवालात काय माहीती आहे?

१६ वर्षीय तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून या अहवालात तरुणीच्या शरीरावर चाकूने १६ वार केल्याचं सांगितलं जात आहे. तर दगडाने ठेचल्यामुळे तिचं डोक फुटलं आहे. ‘तरुणीच्या गळ्यावर चाकूचे ६ वार आहेत तर पोटावर १० वार आहेत,’ असं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. पोलीस संपूर्ण शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

दिल्लीतील जेजे कॉलनी येथील 16 वर्षीय तरुणीचं आणि साहिल नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. रविवारी ( २८ मे ) ला रात्री अल्पवयीन तरुणी आपल्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जात होती. तेव्हाच रस्त्यामध्ये साहिलला तिने अडवलं. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. याच रागातून साहिलने तरुणीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दगडाने तिचं डोक ठेचलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या अल्पवयीन तरुणीच्या आईने सांगितले की, “मुलगी गेल्या १० दिवसांपासून मैत्रिणीच्या घरात राहत होती. आम्ही मुलीला अनेकवेळा साहिलबाबत विचारलं होतं. तर साहिलला फाशीची शिक्षा दिली पाहिजे,” अशी मागणी तरुणीच्या आईने केली आहे.