देश

हनुमानाच्या जन्म स्थळाचा वाद मिटला; 'या' ठिकाणाबाबत देण्यात आले पुरावे

विनायक होगाडे

हैदराबाद : अंजनेय श्री हनुमान) यांचा जन्म तिरुपती येथील अंजनाद्री पर्वतावर झाल्याचे पुरावे स्पष्टपणे पुराण आणि धार्मिक ग्रंथात सापडतात, असे प्रोफेसर मुरलीधर शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मुरलीधर शर्मा हे टीटीडी आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाने नियुक्त केलेल्या पंडित परिषदेचे अध्यक्ष आहेत. तिरुपती देवस्थान समिती आणि हंपी येथील गोविंद सरस्वती स्वामी यांच्यातील चर्चेत दोन्हीकडचे म्हणणे मांडण्यात आले. (Scholars declare Tirumala as the birthplace of Hanuman)

पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले की, हंपी येथील श्री हनुमान जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्तांचे संस्थापक श्री गोविंद सरस्वती स्वामी यांनी श्री अंजनेय यांचा जन्म हंपीजवळील पंपानदीच्या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अंजनाहल्ली येथे झाल्याचा दावा केला होता. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना तिरुपतीचे निमंत्रण देण्यात आले. गोविंद सरस्वती स्वामी यांच्यासमवेत श्री कृपा विश्‍वनाथ शर्मा यांनी तीन तास चर्चा केली. गोविंद स्वामी यांनी मांडलेल्या युक्तिवादाला आव्हान देण्यात आले. या वेळी टीटीडी समितीकडून पुराणातील संदर्भ देण्यात आले.

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या प्रयत्नांना स्वामींनी दुर्लक्ष करु नये, असेही आवाहन चर्चेच्या वेळी करण्यात आले. तीन तासाच्या प्रदीर्घ आणि सर्वंकष चर्चेनंतर कृपा शर्मा विश्‍वनाथ यांनी तिरुपतीसंदर्भातील दावे ठोस असल्याचे सांगितले. हंपी येथील स्वामी यांच्या युक्तिवादाला कोणताही आधार सिद्ध होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये ‘शून्य सावली दिवस’चा अनोखा अनुभव; सूर्य थेट डोक्यावर आल्याने काही क्षण सावलीच गायब

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT