'हे काय बरोबर नाही!' ममतांच्या वर्तनावर राजनाथ सिंह नाराज

'हे काय बरोबर नाही!' ममतांच्या वर्तनावर राजनाथ सिंह नाराज

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळामुळे ओडीसा आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा घेतला. या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाचा हवाई दौरा करुन त्यांनी काही बैठका देखील घेतल्या. पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला फार महत्त्व न देण्याचं धोरण ममता बॅनर्जी यांनी पत्करल्याचं थेट दिसून आलं. त्यांनी या बैठकीला अनुल्लेखाने मारण्याचा प्रकार केला. त्या या बैठकीला अर्धा तास उशीरा पोहोचल्या. (Defence Min Rajnath Singh says This is an example of placing political differences over constitutional duty)

'हे काय बरोबर नाही!' ममतांच्या वर्तनावर राजनाथ सिंह नाराज
मोदींच्या बैठकीत उशीरा येऊन ममता म्हणाल्या, 'इतरही बैठका आहेत, निघते'

यास चक्रीवादळासंदर्भात पंतप्रधान मोदींच्या या आढावा बैठकीत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, ममता बॅनर्जी, केंद्री मंत्री देवाश्री चौधरी आणि धर्मेंद्र प्रधान देखील सामील झाले. याशिवाय विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी देखील सामील झाले होते, मात्र ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत यायला अर्धा तास उशीर केला. आल्यानंतर त्यांनी चक्रीवादळाच्या नुकसानीसंदर्भातील कागदपत्रे बैठकीत सादर केली, इतर नियोजित बैठका असल्याचं सांगत त्या निघून गेल्या. थोडक्यात, ममता बॅनर्जी यांनी बैठकीत बसण्यास नकारच दिला आहे.

'हे काय बरोबर नाही!' ममतांच्या वर्तनावर राजनाथ सिंह नाराज
दहा सेकंदात टोल भरुन घ्या अन्यथा कारवाई; वाहतुक कोंडी टाळण्यासाठी NHIA च्या सुचना

यावर आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, पश्चिम बंगालमधील आजचा घटनाक्रम स्तब्ध करणारा आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या व्यक्ती नसून त्या संस्था आहेत. दोन्हीही जनसेवेचा संकल्प आणि संविधानाप्रती निष्ठेची शपथ घेतात. आपत्ती काळामध्ये बंगालच्या जनतेला मदत करण्याच्या उद्देशाने आलेल्या पंतप्रधानांसोबत याप्रकारचे वर्तन करणे त्रासदायक आहे. जनसेवेचा संकल्प आणि संवैधानिक कर्तव्याच्या वर राजकीय मतभेदांना ठेवण्याचे हे एक दुर्दैवी उदाहरण आहे. हा प्रकार भारतीय संघ लोकशाही व्यवस्थेच्या मूळ भावनेला ठेच पोहोचवणारा आहे.

या बैठकीला सुवेंदु अधिकारी यांना देखील निमंत्रण दिलं गेलं होतं, ज्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी जाहीर केली होती. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारमधील अंतर अधिक वाढण्याच्या शक्यता आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com