Lord Rama in Ayodhya finalized  
देश

Ram Mandir: राम लल्लाची मूर्ती झाली निश्चित; प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांना मिळाले भाग्य

Lord Rama in Ayodhya finalized राम मंदिरातील प्रभु रामाची मूर्ती निश्चित झाली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेली राम लल्लाची मूर्ती राम मंदिरात ठेवण्यात येणार आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राम मंदिरातील प्रभु रामाची मूर्ती निश्चित झाली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेली राम लल्लाची मूर्ती राम मंदिरात ठेवण्यात येणार आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. (selection of the idol for the Prana Pratishtapana of Lord Rama in Ayodhya has been finalized renowned sculptor of our country Yogiraj Arun)

प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय की, जेथे राम, तिथे हनुमान. अयोध्यामध्ये भगवान रामाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मूर्तीची निवड करण्यात आली आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांची मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होईल.

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी मूर्तीची निवड करण्यात येणार होती. अखेर प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेली मोहक मूर्ती निवडण्यात आली आहे. योगिराज अरुण यांच्या आई सरस्वती यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या निवडीवरुन आनंद व्यक्त केला आहे. म्हैसुरचे शिल्पकार योगीराज अरुन यांनी बनवलली मूर्ती अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली आहे. यामुळे राज्याचा गौरव आणि प्रसन्नता दुप्पट झाली आहे. शिल्पकार योगीराज यांना खूप अभिनंदन.

योगीराज आनंद कोण आहेत?

योगीराज अरुण हे कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. योगीराज शिल्पी यांनी वाडिया घराण्याच्या राजवाड्यांच्या संदर्भात अनेक महत्त्वाची शिल्प उभारल्याचं सांगितलं जातं. योगीराज अरूण हे ३७ वर्षांचे असून त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्यांनीच इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंच पुतळा बनवला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT