Disability Empowerment
Disability Empowerment 
देश

Disability Empowerment : विमल गव्हाणे, डॉ. धूत, चव्हाण, भोईर यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : समाजात दिव्यांगांसाठी निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या गरजेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला. असे झाल्यास दिव्यांगजन समाजात सन्मानाने जीवन जगू शकतील तसेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये कोणताही भेदभाव न होता सहभागी होऊ शकतील, असेही त्या म्हणाल्या.

दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त दिव्यांग सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी वितरण झाले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार , राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतिमा भौमिक आदी उपस्थित होते.

दिव्यांगांच्या क्षेत्रातील कार्यासाठी २०२१ चे राष्ट्रीय पुरस्कार २५ व्यक्ती, संस्था आणि संस्थांना, तर २०२२ साठी २९ व्यक्ती, संस्था आणि संस्थांना दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिव्यांगांसाठीच्या ‘सुगम्य भारत'' अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल महाराष्ट्रातील ४ व्यक्ती, १ संस्था आणि अकोला जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनाचे उद्दिष्ट अपंगांशी संबंधित समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.

‘सुगम्य भारत''ची अंमलबजावणी

‘सुगम्य भारत अभियान’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला मिळालेला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांनी स्वीकारला. नाशिक ,मुंबई, पुणे, नागपूर या चार शहरांतील १३७ इमारती दिव्यांगांसाठी सुलभ म्हणजे सुगम्य करण्यासाठी केंद्र शासनाकडून आतापर्यंत २१९७.३८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. याशिवाय २४ संकेतस्थळेही सुगम्य करण्यात आलेली आहेत.

संस्था गटातील विजेते

१९९४ मध्ये स्थापन झालेल्या औरंगाबादच्या महात्मा गांधी सेवा संघाला सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. या संस्थेव्दारे दिव्यांग व्यक्तींना आरोग्य सेवा, सामाजिक, शैक्षणिक व पूनर्वसनात्मक सेवा दिल्या जात असून आतापर्यंत १ लाखाहून अधिक दिव्यांग वृद्धांना सहाय्यक साधने वितरित करण्याचे काम संस्थेने केले आहे. संस्थेचे सचिव विजय कान्हेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. दिव्यांग अधिकार कायदा तसेच वैश्विक ओळखपत्र प्रणाली व दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा या श्रेणीतील पुरस्कार अकोला जिल्हा परिषदेला २०२१ साठी प्रदान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी तो स्वीकारला.

व्यक्ती गटातील विजेते

पुण्याच्या विमल पोपट गव्हाणे यांना श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या पुणे जिल्हयात तालुका हवेली पेरणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य कर्मचारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कोरोनासाथीदरम्यान रुग्णांचे लसीकरणाच्या कामात वरि‍ष्ठ वैद्यकीय अधिका-यांसोबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कुटुंब नियोजन, पल्स पोलिओ लसीकरण, १६ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालकांचे लसीकरण यासह आरोग्य केंद्रांतर्गत राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याच्या उपक्रमांमध्ये गव्हाणे यांचा सहभाग असतो.

पुण्याचे डॉ. शुभम धूत यांनाही श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती श्रेणीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. ते टिळक आयुर्वेद महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी ७ वर्षे संशोधन करून हिमोफिलिया विकारावर ‘रक्तामृत’ या आयुर्वेदिक औषधाचा शोध त्यांनी लावला आहे. नागपूरचे उद्योजक जयसिंग चव्हाण यांना २०२२ साठी गौरविण्यात आले. चव्हाण हे ८७ टक्के अस्थ‍िव्यंग आहेत. त्यांनी अर्थव्यवहार विषयात एमबीए केले आहे. रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे ते संचालक आहेत. त्यांनी आतापर्यंत २०० पेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील अशोक भोईर यांना २०२१ साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. बोत्रे यांना पुरस्कार

मूळचे पुण्याचे डॉ भाऊसाहेब बोत्रे यांना संशोधन क्षेत्रातील दिव्यांग सक्षमीकरण पुरस्काराने आज गौरविण्यात आले. ते गतिविषयक दिव्यांग आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पीएचडी केलेली आहे. सध्या ते सीएसआईआर राजस्थानमध्ये मुख्य वैज्ञानिक या पदावर कार्यरत आहेत. बोत्रे यांच्या नावावर दोन स्वामित्व ( पेटेंट), आणि कॉपीराईटच्या नोंदी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Jayant Patil : "जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, टोकाला जायला...", विशाल पाटील अन् कदमांना इशारा, काय आहे प्रकरण?

Kitchen Hacks : सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स वापरून पाहा, वर्षभर राहतील ताजे अन् खराबही होणार नाही

Chandu Champion : "रडून रडून माझी अवस्था वाईट झाली"; चंदू चॅम्पियनचं शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी केलं भरभरून कौतुक

Assam Electricity Bills: सरकारी कर्मचारी, मंत्र्यांना लाईट बिल स्वतःच्या खिशातून भरावं लागणार; 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय

MG Comet EV : भारताची सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार पाहिलीत काय? जाणून घ्या शॉकिंग फीचर्स आणि इतकी कमी किंमत

SCROLL FOR NEXT