Poonch Terror Attack 
देश

Terrorist Attack: सात दहशतवाद्यांनी घडवला 'तो' हल्ला! 5 जवानांना गमवावा लागला जीव

दहशतवादी जैश-ए-महंम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबा या संघटनांचे सदस्य असल्याची माहिती समोर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पूंच जिल्ह्यात काल लष्कराच्या वाहनाला लागलेल्या आगीच पाच जवानांचा होरपळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. पण यामागे दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती समोर आली असून सात दहशतवाद्यांनी मिळून हा हल्ला घडवून आणल्याचं समोर आलं आहे. लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Seven terrorists involved in Poonch terror attack that killed five Army jawans says Sources)

लष्कराच्या गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तैय्यबा या पाकिस्तान पुरस्कृत दोन्ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात कार्यरत आहेत. या संघटनांच्या मदतीनं पूंचमध्ये गुरुवारी लष्कराच्या वाहनावर हल्ला घडवून आणण्यात आला. यामध्ये पाच जवान शहीद झाले. 'जैश'चा पाठिंबा असणारा दहशतवादी गट पिपल्स अँटि फॅसिस्ट फ्रन्टकडून (PAFF) या हल्ल्याची जबाबदारी देखील घेण्यात आली आहे.

या घटनेत खरंच दहशतवादी गटांचा सहभाग होता का? याचा तपास गुप्तचर यंत्रणांकडून सुरु आहे. या तपासातून धक्कादायक बाब समोर आली की, 'जैश' आणि 'तैय्यबा'च्या दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मिरमधील विविध भागातून एकत्र यायला सांगितलं होतं. त्यानंतर ते पूंचमध्ये ज्या ठिकाणी लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये लपण्यास सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, हल्ल्याच्या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांकडून बाटा-डोरिया भागात मोठ्या प्रमाणावर सर्च मोहिम राबवण्यात येत असून दहशतवाद्यांना ड्रोन आणि श्वान पथकाच्या मदतीनं शोध घेतला जात आहे. तसेच हल्ल्याच्या जवळच्या सर्व भागात घेराव घालण्यात आला आहे. तसेच बीडीडीएसचं पथक आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपचं पथकही घटनास्थळी तैनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर परिसरातील इंटरनेट बंदीविरोधी याचिकेवर आजच दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT