Shashi Tharoor Sakal
देश

Shashi Tharoor: शशी थरूर यांचे निवृत्तीचे संकेत, आगामी लोकसभा निवडणूक शेवटची?

साधारणपणे दशकभरापूर्वी थरूर यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. २००९ ची निवडणूक त्यांनी प्रचंड मताधिक्याने जिंकली होती. तेव्हा थरूर यांनी ‘भाकप’चे नेते पी. रामचंद्रन नायर यांचा तब्बल ९५ हजार मतांच्या फरकांनी पराभव केला होता.

Sandip Kapde

तिरुअनंतपुरम: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खा. शशी थरूर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले असून तरुण पिढीला संधी देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. लोकसभेची आगामी निवडणूक ही आपली अखेरची निवडणूक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले. येथे पक्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या थरूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपरोक्त मत मांडले.

‘तरुणांना आता संधी द्यायला हवी, हा माझा विचार आहे. राजकारणामध्ये काहीही अशक्य नसते,’ असेही त्यांनी नमूद केले. थरूर म्हणाले, ‘‘ राजकारणाच्या एका टप्प्यावर तरुणांना पुढे आणणे गरजेचे असते. मी कधीही सक्रिय राजकारणापासून दूर झालेलो नाही पण मला वाटते की ही माझी अखेरची निवडणूक असेल. पक्षाने मला पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरविले तर मी पहिल्या इतकाच ताकदीने निवडणूक लढेल. लोकांसाठी अधिक चांगले काम करण्याची माझी इच्छा आहे.’’ (Latest Marathi News)

साधारणपणे दशकभरापूर्वी थरूर यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. २००९ ची निवडणूक त्यांनी प्रचंड मताधिक्याने जिंकली होती. तेव्हा थरूर यांनी ‘भाकप’चे नेते पी. रामचंद्रन नायर यांचा तब्बल ९५ हजार मतांच्या फरकांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील ते विजयी झाले होते.

पंतप्रधान मोदी हिंदूह्रदयसम्राट-

‘‘अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणारा राम मंदिराचा उद्‍घाटन सोहळा आणि त्यानंतर अबूधाबीच्या ‘बीएपीएस’ मधील हिंदू मंदिराच्या उद्‍घाटनानंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेग येईल. कदाचित त्यानंतरच निवडणुका घेतल्या जातील. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचा संदेश स्पष्ट आहे. पंतप्रधान मोदींची हिंदूह्रदयसम्राट अशी प्रतिमा तयार करण्यात येणार असून आता अच्छे दिनचे काय झाले?’’ असा सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT