sukhbir singh badal 
देश

पंजाबचे माजी CM बादल यांच्या ताफ्यावर फायरींग; अकाली दलाचा काँग्रेसवर आरोप

सकाळवृत्तसेवा

चंदीगढ : पंजाब राज्यातील जलालाबादमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. बादल यांच्या ताफ्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. हा हल्ला तेंव्हा झाला आहे, जेंव्हा ते आपल्या मतदरासंघात परतत होते. या ताफ्यातील एका वाहनामध्ये सुखबीर सिंह बादल होते. सुखबीर सिंह मोठ्या काळापासून पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. 

या घटनेवरुन आता अकाली दल आणि काँग्रेस पक्षादरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पोलिसांचा पाठिंबा असलेल्या काँग्रेसच्या गुंडांनी आज शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, असा आरोप शिरोमणी अकाली दलाने केला आहे. तसेच बादल यांच्या संरक्षणार्थ धावलेले तीन पक्ष कार्यकर्ते गोळी लागून जखमी झाले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

सुखबीर सिंह यांना कसल्याही प्रकारची इजा या हल्ल्यामध्ये झालेली नाहीये. तसेच त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. अकाली दलाचं म्हणणं आहे की या हल्ल्यामध्ये त्यांचे काही लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी सध्या पोलिस पोहोचली असून पुढील तपास सुरु आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ'च्या समर्थनार्थ चंद्रकांतदादा, धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात आम्हीही मोर्चा काढू; आमदार शिवाजी पाटलांचा सतेज पाटील, शेट्टींना इशारा

IND A vs AFG A: ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचे दार ठोठावतोय... शतकानंतर आणखी एक दमदार खेळी, गौतम गंभीर देणार का संधी?

MPSC Success Story: पीएसआयची संधी हुकली, पण हार मानली नाही; अखेर MPSC मधून निळकंठ गुडपळे महसूल सहाय्यकपदाला गवसणी, जिद्दीने गाठले यश..

Vajreshwari Kund : वज्रेश्वरीतील गरम पाण्याचे झरे धोक्यात! शंकर मंदिरासमोरील पवित्र कुंड पूर्णपणे कोरडे; भाविकांमध्ये तीव्र नाराजी, गेल्या 3 वर्षांपासून नेमकं काय घडतंय?

Gangapur farmers: गंगापूर तालुक्यात मान्सून रखडल्याने शेतकरी चिंताग्रस्त; मृग नक्षत्रात पावसाची प्रतीक्षा, 15 जूननंतर पेरणीचा सल्ला

SCROLL FOR NEXT