esakal | 'राम मंदिराच्या नावे पैसे गोळा करुन दारू पितात'; काँग्रेस आमदाराचा भाजप नेत्यांवर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

ram mandir

काँग्रेस आमदाराने पुढे म्हटलंय की, मंदिर बनवण्यासाठी हजार कोटी रुपये जमा केले गेलेत ज्याचा वापर भाजप नेते आपल्या स्वार्थासाठी करत आहेत.

'राम मंदिराच्या नावे पैसे गोळा करुन दारू पितात'; काँग्रेस आमदाराचा भाजप नेत्यांवर आरोप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

झाबुआ : मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेत्याने केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. या वक्तव्यावरुन सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे. दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनी अलिकडेच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्यानंतर आता वरिष्ठ काँग्रेस नेते आणि आमदार कांतीलाल भूरिया यांनी असंच केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे. त्यांनी म्हटलंय की, 'भाजपचं स्वप्न हे राम राम जपना, पराया माल अपना' असं आहे. हे आपल्याकडून वर्गणी घेतील आणि आता पंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या विरोधातच खर्च करतील. 

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे कांतीलाल भूरिया यांचं राम मंदिराच्या वर्गणीवरुन केलं गेलेलं हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, सगळे म्हणतात की 'मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे' ते हजार कोटी रुपये जमा करत आहेत आणि त्याचा हिशेब देत नाहीयेत. तो हिशेब द्या. हा पैसा थेट मंदिराच्या ट्रस्टमध्ये जमा करा. हजारो कोटी रुपये कुठे गेलेत, जे भाजपने हडप केले आहेत. भाजपाचे नेते दिवसभर वर्गणी गोळा करतात आणि रात्री नदी किनाऱ्यावर जाऊन दारू पितात. 

हेही वाचा - पोलिसांचे सिंघू बॉर्डरवर DJ लावून 'संदेसे आते है'; शेतकऱ्यांची गाणं बंद करण्याची मागणी
काँग्रेस आमदाराने पुढे म्हटलंय की, मंदिर बनवण्यासाठी हजार कोटी रुपये जमा केले गेलेत ज्याचा वापर भाजप नेते आपल्या स्वार्थासाठी करत आहेत. याआधी दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनी देखील राम मंदिराच्या निर्मितीसाठी दिल्या गेलेल्या वर्गणीवरुन वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, रामाच्या नावावर मोठ्या साहेबांनी देखील 1,11,111 रुपयांची वर्गणी दिली आहे. मला देखील फोन आलेला. मी म्हटलं की मी तुम्हाला देणार नाही. मी अयोध्येत जाऊन रामाच्या चरणावर वर्गणी देऊन येईन. मात्र, तुमच्या हातात एक फुटकी कवडी सुद्धा देमार नाही. आणि तुम्ही देखील देऊ नका. 

loading image