Sidhu Moose Wala Murder Case esakal
देश

Sidhu Moose Wala : सिध्दू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी पंजाब पोलिसांच्या तावडीतून फरार

सिध्दू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सिध्दू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला आहे.

चंदीगड : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिध्दू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी (Sidhu Moose Wala Murder Case) अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याचं वृत्त आहे. सिध्दू मुसेवालाला गोळ्या घालणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचा शूटर पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) ताब्यातून फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळं पंजाब पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा शूटर दीपक टिनू (Deepak Tinu) हा सीआयए पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसा सीआयए स्टाफची टीम त्याला कपूरथला जेलमधून रिमांडवर आणत होती. यावेळी पोलिसांच्या पथकाला चकमा देऊन तो पळून गेल्याचं सांगितलं जात आहे.

एएनआय वृत्तानुसार, मानसा पोलिसांनी (Mansa Police) दीपक टिनू फरार झाल्याची पुष्टी केलीय. मानसा पोलिसांनी सांगितलं की, 'आज सकाळी दीपक टिनूला सीआयए कर्मचार्‍यांच्या पथकाद्वारे कपूरथला कारागृहातून एका खासगी वाहनातून रिमांडवर मानसा इथं आणलं जात होतं. यावेळी दीपक टिनू फरार झाला. सिध्दू मूसेवाला खून प्रकरणाशी त्याचा संबंध तपासला जात आहे.'

मुसेवाला हत्येबाबत त्याची लॉरेन्स बिश्नोईशी चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं आहे. या दोघांनी 27 मे रोजी कॉन्फरन्स कॉलद्वारे बोलून 29 मे रोजी मुसेवाला यांची हत्या केली. मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये दीपक टिनूचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. सिध्दू मुसेवाला हत्येप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आली असून, चकमकीत दोघांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT