Sikkim Avalanche News 
देश

Sikkim Avalanche : भीषण घटना! हिमस्खलनात ६ पर्यटक ठार, ८० हून अधिक लोक अडकल्याची भीती

Sikkim Avalanche News: सिक्कीममधील नाथूला सीमावर्ती भागात आज (मंगळवार) मोठा हिमस्खलन झालं.

Sandip Kapde

Sikkim Avalanche News: सिक्कीममधील नाथूला सीमावर्ती भागात आज (मंगळवार) मोठा हिमस्खलन झालं. या घटनेत ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जवळपास ८० पर्यटक अडकल्याची भीती आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हिमस्खलनानंतर गंगटोक ते नाथू ला जोडणाऱ्या १५ व्या मैल जवाहरलाल नेहरू मार्गावर बचावकार्य सुरू आहे.

बर्फात अडकलेल्या २२ पर्यटकांची सुटका करण्यात आली. त्यांना गंगटोक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

तसेच रस्ता मोकळा केल्यानंतर अडकलेल्या ३५० पर्यटकांची आणि ८० वाहनांची सुटका करण्यात आली.

भारत-चीन सीमेजवळील नाथू ला या उंच पर्वतीय खिंडीजवळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झालं. हिल पास समुद्रसपाटीपासून ४,३१० मीटर (१४,१४०फूट) उंचीवर आहे आणि एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT