Dog Attack Viral Video : भटक्या कुत्र्यांची दहशत! भीतीपोटी गाडी धडकली अन् लहान मुलांसह आई...

ओडीशाच्या बेरहामपूर शहरातली घटना.
Dog Attack Viral Video
Dog Attack Viral Videoesakal
Updated on

Street Dog Attack CCTV Footage Viral Video : भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भटक्या कुत्र्यांचे हल्ले हा चिंतेचा विषय होऊ लागला आहे. या हल्ल्यांमध्ये कधी चिमुकल्यांना जीव गनमवावा लागला, तर काही जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. रस्त्यावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये ती कैद झाली आहे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी स्कूटरवरून जात असलेल्या महिलेवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे.

ओडिशाच्या बेरहामपूर शहरातली ही घटना आहे. भट्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची ही घटना सीसी टीव्हीमध्ये कैद झाली आहे. एक महिला आपल्या मुलाला शाळेत सोडायला निघाली होती. समोर मुलगा उभा होता तर मागे अजून एक महिला बसलेली होती. दरम्यान त्यांच्या स्कूटरचा काही भटक्या कुत्र्यांनी पाठलाग सुरू केला.

चार पाच कुत्रे एकाचवेळी पाठलाग करत असल्याने भीतीने महिलेने आपल्या स्कूटीचा स्पीड वाढवला. पण तिचं स्कूटीवरचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडकली. धडकेमुळे मुलासह दोन्ही महिला रस्त्यावर जोरात आपटल्या.

सुदैवाने अपघातानंतर कुत्रे पळून गेले. पण या घटनेत तो लहान मुलगा आणि दोन्ही महिला प्रचंड घाबरलेल्या दिसत आहेत. हा व्हिडीओ बघून थोड्यावेळासाठी तुमचाही श्वास थांबेल. धस्स करणारा हा व्हिडीओ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com