Accident in Gujarat Anand District esakal
देश

गुजरातमध्ये भीषण अपघात; काँग्रेस आमदाराच्या जावयानं 6 जणांना चिरडलं, सर्वांचा मृत्यू

पोलिसांनी आमदाराच्या जावईविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी आमदाराच्या जावईविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

आनंद (गुजरात) : गुजरातमधील (Gujarat) आनंद जिल्ह्यातील (Anand District) सोजित्राजवळ भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 4 जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले 3 जण एकाच कुटुंबातील आहेत.

कार, ​​ऑटो आणि दुचाकीची धडक

या प्रकरणाची माहिती देताना आनंदचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिषेक गुप्ता यांनी सांगितलं की, हा अपघात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. कार, ​​बाईक आणि ऑटो रिक्षा यांच्यात भीषण टक्कर होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ऑटोवरील चार आणि दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. तर, कार चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.

काँग्रेस आमदाराच्या जावयाची कार

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार काँग्रेस आमदार केतन पादियार यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. केतन पादियार हे काँग्रेसच्या आमदार पूनमभाई परमान यांचे जावई आहेत. सध्या पोलिसांनी आमदार जावईविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आमदार जावयाला अटक केलीय. पोलिसांनी काँग्रेस आमदाराच्या जावयावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

Ganesh Chaturthi 2026: यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग आधी पूजा कोणाची करायची? उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Phulambri News : काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांच्या खुर्चीला निवेदन.! छत्रपती संभाजीनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

SCROLL FOR NEXT