Yogi Adityanath UP Assembly poll esakal
देश

48 तासांत सहा नेत्यांचा भाजपला 'राम राम', निवडणुकी आधी धक्का!

ओमकार वाबळे

देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं. यानंतर उत्तर प्रदेशात राजकीय नाट्य रंगल्याचं दिसतंय. विरोधक योगी आदित्यनाथ यांना विविध कारणांवरून घेरत असताना आता भाजपला गळती लागल्याचं दिसतंय. भाजपातील काही दिग्गजांनी ऐन निवडणुकीआधीच पक्षाला 'राम राम' केला आहे. (Uttar Pradesh Election 2022)

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) आणखी एक धक्का बसला असून, ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत पक्ष सोडणारे चौहान हे सहावे नेते आहेत. मात्र, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या (SP)दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

एका दिवसापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर भाजप नेत्यांची खलबतं पार पडली होती. दिल्लीत झालेल्या या बैठकांमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्य मंत्रिमंडळ सोडलं होतं. त्यानंतर भाजपचे आणखी एक आमदार अवतार सिंग भडाना यांनी पक्ष सोडला आणि समाजवादी पार्टीचे सहयोगी असलेल्या राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केला.

मौर्य यांच्या समर्थनार्थ भाजपच्या इतर तीन आमदारांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली. मंगळवारी, भाजप आमदार ब्रजेश प्रजापती, तिल्हारचे रोशन लाल वर्मा आणि बिल्हौरचे भगवती सागर यांनी आपण पक्ष सोडत असल्याची घोषणा केली होती. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे दोन आमदार काँग्रेसचे नरेश सैनी आणि सपामधील हरी ओम यादव हे दोघेही बुधवारी भाजपमध्ये सामील झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मोठी कारवाई! विद्यार्थ्यांवर ड्रग्जमाफियांचा डोळा, ४१.६० लाखांच्या अमली पदार्थांसह तस्कर जेरबंद

SCROLL FOR NEXT