योगींना पहिला धक्का देणाऱ्या मंत्री मौर्य यांच्या अटकेसाठी वॉरंट

UP
UPTeam eSakal
Summary

योगी सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.

लखनऊ - उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पक्षांतराला जोर आला आहे. योगी सरकारमधील दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला असून सपा, काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, योगींना (Yogi Adityanath पहिला धक्का देणारे स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरच्या एमएलए न्यायालयाने त्यांना धार्मिक भावना भडकावल्या प्रकरणी हे अटक वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाने मौर्य यांना २४ जानेवारीपर्यंत न्यायालायत हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

२०१४ मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यात मौर्य यांनी म्हटलं होतं की, लग्नामध्ये गौरी-गणपतीची पूजा करु नये. हे मनुवादी व्यवस्थेत दलित आणि मागास वर्गाची दिशाभूल करण्याचं षडयंत्र आहे. या प्रकरणी बुधवारी स्वामी प्रसाद मौर्य हे न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे अप्पर मुख्य दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं. पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.

UP
PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी : 'पोलिसांना रोखणारा काँग्रेस नेता कोण?'

योगी सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. मौर्य हे उत्तर प्रदेशातील ओबीसींचे मोठे नेते आहेत. पाचवेळा आमदार राहिलेल्या मौर्य यांनी २०१७ मध्ये बसपातून बाहेर पडत भाजप प्रवेश केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com