Rameswaram Cafe Bomb Blast Case esakal
देश

रामेश्वरम् कॅफे बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवाद्याचे रेखाचित्र व्हायरल; आरोपी बसमधून तुमकूरहून बळ्ळारीत गेल्याचा संशय

गेल्या आठवड्यात बंगळूरमधील लोकप्रिय फूड सेंटर ‘द रामेश्वरम कॅफे’ येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत पोलिसांना महत्त्वाचा सुगावा मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

हर्षाने सीसीटीव्हीवरील अस्पष्ट फोटोच्या आधारे एक काल्पनिक रेखाटन काढले आहे. त्याने संपूर्ण चेहऱ्याचे रेखाचित्र रेखाटले आहे.

बंगळूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) रामेश्वरम् कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील (Rameswaram Cafe Bomb Blast Case) बॉम्ब ठेवलेल्या संशयित दहशतवाद्याचा (Terrorists) सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केलेला फोटो जारी केला आहे. या फोटोच्या आधारे हर्षा नावाच्या कलाकाराने संशयित आरोपीचे रेखाचित्र रेखाटले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

हर्षाने सीसीटीव्हीवरील अस्पष्ट फोटोच्या आधारे एक काल्पनिक रेखाटन काढले आहे. त्याने संपूर्ण चेहऱ्याचे रेखाचित्र रेखाटले आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करून एनआयए आणि शहर पोलिसांना (Bangalore Police) टॅग केले. एनआयएने मास्कशिवाय रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील संशयिताचा फोटो प्रसिद्ध केला आणि संशयित व्यक्तीची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.

संशयित तुमकूरमार्गे बळ्ळारीकडे?

गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी गुरुवारी सांगितले की, गेल्या आठवड्यात बंगळूरमधील लोकप्रिय फूड सेंटर ‘द रामेश्वरम कॅफे’ येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत पोलिसांना महत्त्वाचा सुगावा मिळाला आहे. संशयिताने कपडे बदलून बसमधून प्रवास केला होता. स्फोटानंतर संशयिताने कपडे बदलून टोपी सोडून गेल्याचे कळते. त्याची सीसीबी आणि एनआयए पोलिसांच्या पथकालाही माहिती समजली आहे.

आरोपीने तुमकूरच्या दिशेने बसमधून प्रवास केल्याचे सांगण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी बळ्ळारीपर्यंत त्याचा माग काढला. एक मार्च रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत असून बंगळूर पोलिस केंद्रीय गुन्हे शाखा एनआयएला मदत करत आहे.

‘संशयित कोणत्या दिशेला गेला आणि त्याने आपले कपडे कुठे बदलले, याची महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली आहे; पण काही माहिती उघड करता येणार नाही. गेल्या काही दिवसांत आम्हाला ठोस धागेदोरे मिळाले आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल’, असे परमेश्वर यांनी पत्रकारांना सांगितले.

बसमधून प्रवास

संशयिताने बसमधून प्रवास केल्याची माहिती मिळाली आहे. त्या सूत्रांच्या आधारे अधिकारी तपास करत आहेत. संशयिताने तुमकूरच्या दिशेने बसमधून प्रवास केल्याचे संकेत आहेत. अधिकाऱ्यांनी फुटेजचे पुनरावलोकन केले आहे. संशयित तुमकूरहून बळ्ळारी येथे गेला असल्याचा संशय आहे”, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT