Slipper Factory Narela Industrial Area
Slipper Factory Narela Industrial Area esakal
देश

नरेला परिसरात चप्पल कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या दाखल

सकाळ डिजिटल टीम

नरेला औद्योगिक परिसरातील एका तीन मजली कारखान्याला भीषण आग लागलीय.

नवी दिल्ली : नरेला औद्योगिक परिसरातील (Narela Industrial Area) एका तीन मजली चप्पल बनवणाऱ्या कारखान्याला (Slipper Factory) सोमवारी रात्री भीषण आग लागलीय. अग्निशमन विभागाच्या दहा गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्लास्टिकमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नरेला औद्योगिक परिसरातील एका तीन मजली कारखान्याला आग लागलीय. या कारखान्यात चप्पल बनवण्याचं काम केलं जातं. आग लागली, तेव्हा कारखान्यात कोणीही उपस्थित नव्हतं. सर्व कामगार कामावरून घरी परतले होते. सध्या आगीचं कारण समजू शकलेलं नाहीय.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असता, आग तिसर्‍या मजल्यावर पसरल्याचं दिसलं. यानंतर आणखी गाड्यांना पाचारण करण्यात आलंय. सध्या दहा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे मुंडका, बवाना आणि नरेला औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना आग लागण्याच्या अनेक घटना सध्या घडत आहेत. उन्हाळी हंगामात कारखान्यांना आग लागण्याच्या दोन डझनाहून अधिक घटना घडल्या आहेत. इमारतीला लागलेल्या आगीमुळं 27 जणांचा मृत्यू झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT