Smriti Irani  Sakal
देश

Smriti Irani : लोकसभा निवडणुकीत पुलाप्रमाणे विरोधकही वाहून जातील - स्मृती इराणी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी; काँग्रेसवरही टीका

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : विरोधी पक्षांची २३ जूनला बिहारमध्ये बैठक होणार असून यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. हे सर्व पक्ष एकमेकांचा आधार घेण्याचा प्रयत्न करणार असतील, मात्र भागलपूरमध्ये नुकताच एक पूल वाहून गेला त्याप्रमाणेच हे सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीत वाहून जातील, असा टोला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लगावला.

इराणी यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर टीका केली. राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’वरही त्यांनी टीका केली. २३ जूनला पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बाबत इराणी यांना प्रश्‍न विचारला असता त्या म्हणाल्या,‘‘हे सर्व पक्ष स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम नसल्यानेच ते एकमेकांचा आधार घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

तीन दिवसांपूर्वीच ज्या भागात १७५० कोटी रुपयांचा पूल वाहून गेला, तिथेच हे सर्व जण भेटत आहेत. पुलाप्रमाणे २०२४ मध्ये हे सर्व जण वाहून जातील.’’ काँग्रेसवर टीका करताना स्मृती इराणी म्हणाल्या,‘‘राहुल गांधी हे मोहब्बत की दुकान चालवत असल्याचा दावा करतात.

मात्र, त्यांची मोहब्बत म्हणजे हिंदू जीवनपद्धतीचा अनादर करणे, शीखांचे हत्याकांड घडवून आणणे, भारतद्वेष करणाऱ्यांशी मैत्री करणे आणि भारताच्या लोकशाहीत हस्तक्षेप करण्यासाठी इतरांना निमंत्रण देणे, ही आहे का? स्मृती इराणी यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT