Congress-BJP : ‘मुस्लिम लीग’वरून भाजप, काँग्रेस भिडले; भाजपच्या पूर्वजांचा जिनांशी संबंध

त्रिवेदी : मतांसाठी लांगूलचालन; मुस्लिम लीग’ हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष असून तो काही धर्मांध नाही
BJP Congress clash over Muslim League BJP forefathers relationship with Jinha
BJP Congress clash over Muslim League BJP forefathers relationship with Jinhaesakal

वॉशिंग्टन / नवी दिल्ली : सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना केरळमधील मित्र पक्ष मुस्लिम लीगला ‘धर्मनिरपेक्ष’ असे संबोधल्यानंतर मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

सत्ताधारी भाजपने याच मुद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला असून काँग्रेसनेही या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘मुस्लिम लीग’ हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष असून तो काही धर्मांध नाही. आता ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे त्यांना या पक्षाबाबत अभ्यास केलेला दिसत नाही, असे राहुल पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

राहुल यांच्या या वक्तव्याचे ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ने स्वागत केले असून त्यांचे वक्तव्य हे काँग्रेस पक्षाला आलेल्या अनुभवावर बेतलेले असल्याचे सरचिटणीस पी.के. कुन्हालीकुट्टी यांनी सांगितले. राहुल यांच्या वक्तव्यावरून दिल्लीत भाजपचे प्रवक्ते खासदार सुधींद्र त्रिवेदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

‘‘काँग्रेससाठी कुख्यात दहशतवादी अब्दुल हाफीज, काश्मीरमधील दहशतवादी हे भरकटलेले तरुण आहेत. झाकिर नाईक हा शांतता प्रस्थापित करणारा नेता आहे. केवळ वायनाड लोकसभा मतदारसंघातील मुस्लिमांच्या मतांसाठी राहुल ‘मुस्लिम लीग’सारख्या जातीय पक्षाला धर्मनिरपेक्ष ठरवीत आहे. सात समुद्रापार गेल्यानंतर राहुल गांधी यांची बुद्धीसुद्धा सात समुद्राच्या पार गेलेली दिसून येत आहे.’’

‘भाजपने आपला इतिहास वाचावा’

दुसरीकडे कॉंग्रेसनेही भाजपवर हल्लाबोल केला आहे. देशाच्या फाळणीसाठी कारणीभूत ठरलेली महंमद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग व सद्यःस्थितीतील मुस्लिम लीग हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिले.

BJP Congress clash over Muslim League BJP forefathers relationship with Jinha
Ahmednagar मधील जागेमुळे Congress-NCP मध्ये वाद होणार? Radhakrishna Vikhe Patil यांच्याविरोधात कोण लढणार? | BJP

देशाच्या विभाजनाला जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग कारणीभूत होती. या लीगशी सध्याच्या मुस्लिम लीगचा संबंध नाही. परंतु जिनांच्या मुस्लिम लीगशी भाजपच्या पूर्वजांचा संबंध राहिला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी सरकारसुद्धा चालविले आहे.

जनसंघाचे प्रमुख श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगसोबत जनसंघाने बंगालमध्ये सरकार स्थापन केले होते. जिनांच्या मुस्लिम लीगशी काँग्रेसने कधीही समझोता केला नव्हता याचा दाखला खेडा यांनी दिला. भाजपच्या नेत्यांनी मुस्लिम लीगचा इतिहास वाचावा, असेही खेडा यांनी स्पष्ट केले.

BJP Congress clash over Muslim League BJP forefathers relationship with Jinha
Balu Dhanorkar यांच्या निधनानंतर Pratibha Dhanorkar यांचे गहिवरुन टाकणारे भाषण | Chandrapur | Congress

फाळणी झाल्यानंतर देखील ही मंडळी देशात थांबली, येथे मुस्लिम लीग स्थापन केली अन् खासदार बनले. ही मंडळी शरिया कायद्याचे समर्थन करतात मुस्लिमांसाठी राखीव जागांची मागणी करतात. हे पूर्वीच्याच मुस्लिम लीगचा घटक आहेत. राहुल आणि त्यांच्या काँग्रेसला हिंदू दहशतवादी वाटतात पण मुस्लिम लीग धर्मनिरपेक्ष दिसते.

- अनुराग ठाकूर, केंद्रीयमंत्री

महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ चळवळ सुरू केल्यानंतर तत्कालीन बंगालमध्ये मुस्लिम लीगच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सरकारचा श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक घटक होते. बंगालच्या फाळणीसाठी एकमेव जबाबदार असलेली व्यक्ती म्हणजे मुखर्जी होय.

-जयराम रमेश, काँग्रेसचे नेते

राहुल यांच्या काँग्रेस पक्षाला आलेल्या अनुभवावरूनच त्यांनी आम्हाला ‘धर्मनिरपेक्ष’ असे म्हटले आहे. राहुल यांच्या विधानाकडे आम्ही एक मोठी जबाबदारी म्हणून पाहतो. इंदिरा गांधी यांच्या काळापासून मुस्लिम लीगचा काँग्रेसशी संबंध आहे.

- पी.के. कुन्हालीकुट्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे सरचिटणीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com