Sultanpur esakal
देश

Sultanpur : नऊ दशकांची ओळख असलेले श्रीराम मंदिर

दरवर्षी रामलीला, रामनवमी व इतर धार्मिक उत्सव होतात साजरे

सकाळ डिजिटल टीम

सुलतानपूर : धार्मिक व सांस्कृतिक ठेवा जोपासणारे सुलतानपूर हे विविध देवदेवतांच्या मंदिर आणि पुजा उपसनेसोबत येथील श्रीराम मंदिरसाठीही परिचित आहे. लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील प्रभु श्रीरामांचे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असून या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्रद्धावान रामभक्ताच्या अनुभुतीने झाली असल्याचे सांगण्यात येते. नऊ दशकांपासून असलेल्या जुन्या राम मंदिरात दरवर्षी रामलीला आणि राम नवमी व इतर धार्मिक उत्सव हर्षोल्हासात साजरे केले जातात. गावातील श्रीराम भक्तांसाठी ही मोठी पर्वणीच असते.

मंगल महाराज पारिक हे संसारिक श्रद्धावान श्रीराम भक्त होते. ते नियमित तीर्थयात्रा करीत. सन १९३० च्या दरम्यान मंगल महाराज पारिक हे बद्रिनाथ धाम येथून परत येत असताना राम जन्मभूमी अयोध्या येथे दर्शन करून विश्रांतीसाठी थांबले असता, त्यांच्या अंतःकरणात प्रभुरामचंद्राबाबत श्रद्धाभाव जागृत झाला."आपल्या गावी प्रभु श्रीरामाच्या मुर्तींची स्थापना व मंदिर निर्माण करावे" अशी इच्छा त्यांनी प्रगट केली. अयोध्या येथुन प्रभु श्रीरामाच्या काळ्या संगमरवरी मूर्ती घेऊन ते परत आले. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथुन खांद्यावर मूर्ती घेऊन श्रीरामनामाचा जप करीत पायी चालत आले. तेव्हा पारिक परिवाराची परिस्थिती हलाखीची होती. मात्र मंगल महाराज पारिक यांची श्रीरामाप्रतीची श्रद्धा प्रचंड होती. त्याच श्रद्धाभावाने त्यांनी सुलतानपुर येथील रामभक्तांना एकत्र करून मुर्तींची स्थापना केली.

गावाच्या मधोमध लाहोटी परिवाराच्या घरालगत असलेल्या राम मंदिरात रोज पुजाआर्चा धार्मिक कार्यक्रम होऊ लागले. मुळातच देव अन धार्मिक कार्यात आवड असलेले स्व.नारायणदासजी लाहोटी यांच्या मधील रामभक्तीची ओढ अजूनच वाढत गेली. त्यादरम्यान सुलतानपुर येथे नारायणदासजी लाहोटी यांची जडी -बुटीची औषधी सुलतानपुरसह परिसरातील घराघरात सुपरिचित होती. भगवंतावर त्यांची अपार श्रद्धा होती. नंतरच्या काळात नारायणदासजी लाहोटी यांचे पुत्र रामप्रसादजी लाहोटी वडिलांचे गुण घेते वैद्यकीय क्षेत्रात आले. साधु-संतांचे आदरतिथ्य व प्रभु रामचंद्राच्या भक्तीचे संस्कार स्वर्गीय डॉ. रामप्रसादजी लाहोटी यांच्यात भिनला गेला.

त्यामुळे "श्रीराम दवाखाना " या नावाने रुग्ण सेवेचा श्री गणेशा केला. हळुहळु त्यांच्या सेवा कार्याची चांगली फलश्रुती येऊ लागली. स्वर्गीय डॉ. रामप्रसादजी लाहोटी यांची मुले हेमराज लाहोटी, संजय लाहोटी यांच्यावर वडिलांच्या संस्कारांचे बीजारोपण झाले. हेमराज लाहोटी हे वैद्यकीय क्षेत्राकडे वळले अन वडिलांसोबत "श्रीराम हॉस्पीटल" च्या माध्यमातुन रुग्ण सेवा करू लागले. तर संजय लाहोटी हे उच्चशिक्षण क्षेत्राकडे वळले. आशातच पाहता पाहता डॉ. हेमराज लाहोटी यांच्या रुग्ण सेवेचा साक्षात्कार गाव परिसरच नव्हे महाराष्ट्र अन राज्याबाहेर सुद्धा पोहोचला. प्रभु श्रीरामचंद्राची सेवा आणि रुग्णसेवेच्या कार्याला लाहोटी परिवाराची चौथी पिढी भक्कमपणे पुढे नेत आहे .

श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती

स्वर्गीय डॉ.रामप्रसादजी लाहोटी यांच्या बाराव्या पुण्यस्मरणानिमित्ताने नोव्हेबर २०२३ ला लाहोटी परिवाराने सुलतानपुर येथे ८५ बेडचे आत्याधुनिक सुसज्ज सुविधायुक्त "श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल" ची निर्मिती केली व हॉस्पिटल परिसरात आयोध्यास्थित श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारून विधिवत पुजा करून डॉ.शशिराज हेमराज लाहोटी व डॉ .ज्योती शशिराज लाहोटी हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिमसह श्रीराम हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवा करीत आहेत !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT