Career Tips : जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

नोकरी बदलणे हा एक फार मोठा निर्णय आहे. मात्र, जर तुम्हाला करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर, हा निर्णय योग्य विचार करून घेणे गरजेचे आहे.
Career Tips
Career Tipsesakal

Career Tips : नोकरी बदलणे हा एक फार मोठा निर्णय आहे. मात्र, जर तुम्हाला करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर, हा निर्णय योग्य विचार करून घेणे गरजेचे आहे. मात्र, नोकरी बदलण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींचा व्यवस्थित विचार करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही खासगी कंपनीत जॉब करत असाल, तर नोकरी बदलल्यामुळे याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

शिवाय, आजकाल प्रतिभाशाली आणि अनुभवी व्यक्तींनी नोकरी बदलणे हे आवश्यक झाले आहे. नोकरी बदलल्यामुळे तुम्हाला विविध प्रकारची कौशल्ये शिकायला मिळतात आणि तुमच्या पगारामध्ये ही वाढ होण्याची शक्यता असते.

त्यामुळे, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक जण नोकरी बदलण्याचा पर्याय निवडतात. मात्र, त्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींचा विचार करणे फायद्याचे ठरते. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या नोकरी बदलताना तुमच्या कामी येतील.

Career Tips
Career Tips : मेकअप आर्टिस्टचे क्षेत्र निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

योग्य वेळेची निवड करा

खरं तर नोकरी बदलण्याची योग्य वेळ कोणती? हे जाणून घेण्याचे कोणतेही सूत्र नाही. हे सर्वस्वी ती व्यक्ती आणि तिच्या कार्यप्रणालीवर अवलंबून असते. कोणत्याही नवीन कर्मचाऱ्याला त्याच्या कंपनीविषयी जाणून घेण्यासाठी एक वर्ष पुरेसे आहे. (What is the right time to change jobs?)

परंतु, जर तुम्ही १ वर्ष पूर्ण व्हायच्या आत नोकरी बदलली तर तुम्हाला अस्थिर मानले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शक्यतो २-५ वर्षांमध्ये नोकऱ्या बदलल्या जाऊ शकतात. तुमच्या कामाच्या अनुभवानुसार तुम्ही हा निर्णय विचारपूर्वक घेऊ शकता.

तुमचे कौशल्य आणि कामाच्या अनुभवाची पारख करा

सर्वात आधी तर तुमचे कौशल्य आणि कामाच्या अनुभवाची चांगल्या प्रकारे पारख करून घ्या. तुम्ही सध्याच्या तुमच्या नोकरीमध्ये काय शिकला आहात? तुमच्याकडे कोणत्या कामाचा अनुभव आणि कौशल्य आहे? जे तुमच्या नव्या नोकरीमध्ये उपयुक्त ठरू शकेल. (Assess your skills and work experience well)

याचा सारासारपणे विचार करा. जेणेकरून तुम्हाला तुमचे कौशल्य आणि कामाचा अनुभव याची योग्य प्रकारे पारख करून अचूक निर्णय घेता येईल.

नोकरी बदलण्यामागची संधी ओळखा

नोकरी बदलण्यामागे काही महत्वाची कारणे असू शकतात. प्रत्येक व्यक्तीला कामाकडून काही अपेक्षा असतात. त्यामुळे, नव्या नोकरीमध्ये सहभागी होण्यापूर्वी तिथल्या भविष्यातील कामाच्या संधी काय आहेत? याचा सखोलपणे विचार करा. (Identify an opportunity for a job change)

ज्या कर्मचाऱ्यांना एखाद्या कंपनीत बरीच वर्षे झाली आहेत. मात्र, जरी त्यांना पदोन्नती मिळाली नसेल आणि पगारातही काही वाढ झाली नसेल तर मग तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार निश्चितपणे करू शकता.

Career Tips
Career Tips : फ्रिलान्स प्रोजेक्ट स्विकारताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com