सेंट्रल व्हिस्टा sakal
देश

सुप्रीम कोर्टाकडून सेंट्रल व्हिस्टाची दखल

आदेशानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाची आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा गंभीर दखल घेतली. केंद्राच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाशी संबंधित बाबींची माहिती न्यायालयाने मागितली असून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करण्यात आले की नाही याबाबत कार्यपूर्ती अहवाल सादर करा, असेही दिल्ली राज्य सरकारला बजावण्यात आले आहे.

राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा या अनुषंगाने करत असलेले काम चांगले आहे, त्याबाबतीत दिशा निर्देश देखील देण्यात आले असले तरीसुद्धा प्रत्यक्षात निष्कर्ष मात्र शून्यच येतो आहे, असे मत सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठाने नोंदविले आहे. हवेच्या शुद्धतेसाठी आयोगाने दिलेल्या दिशा-निर्देशांचे पालन करायचे झाले तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्याबरोबरच त्यांना एका दिवसासाठी तुरुंगामध्ये देखील डांबण्यात यावे, त्याच्याशिवाय नियमांची अंमलबजावणी होणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

याचिकाकर्त्यांची दखल

आजच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ विकाससिंह यांनी दिल्लीमध्ये सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पाची कामे रात्रंदिवस सुरू असल्याचे सांगत लोकांच्या जीवापेक्षा ते फारसे महत्त्वाचे नसल्याचे नमूद केले. सिंह यांच्या या युक्तिवादाची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि सॉलिसिटर जनरल यांना याबाबत शपथपत्र सादर करण्यास सांगण्यात आले. केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या भागांतील कामाबाबत योग्य दिशा- निर्देश घ्यावे असेही न्यायालयाने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT