
..आणि बच्चू कडू धावले..महामार्गावर जखमी पती पत्नी यांना घातले स्वतःच्या गाडीत
नेर्ले : वाळवा येथील राष्ट्रीय महामार्गावर कराड हुन आलेल्या दुचाकीला मारुती कारची धडक बसली.यात दुचाकीवरील पती पत्नी जखमी झाले. ही घटना साडे पाच वाजता घडली. याच दरम्यान महामार्गावरून कराडकडे जाणाऱ्या शालेय व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तातडीने स्वतःची गाडी देऊन पती-पत्नी यांना इस्लामपूर येथील खासगी दवाखान्यात कार्यकर्त्यांच्या मार्फत दाखल केले. मंत्री बच्चू कडू यांच्या माणुसकीच्या दया भावनेने नेर्ले कर वाहन चालकांनी आणि बच्चू कडू यांचे आभार मानले. अपघातातील जखमी पती-पत्नी यांची तब्येत बरी असून त्यांना घरी सुखरूप पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले.
नेर्ले ता वाळवा येथील राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इस्लामपूर येथील विविध कार्यक्रम आटोपून मंत्री बच्चू कडू व त्यांचा ताफा कराड कडे जात असताना नेर्ले येथील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महामार्गाच्या कराडच्या दिशेला गाड्या मार्गस्थ होत असतानाच नेर्ले च्या बाजूला कराड च्या दिशेने कोल्हापूर ला जाणाऱ्या दुचाकीला मारुती कार ने धडक दिली. यावेळी मुख्य चौकात अपघाताचा मोठा आवाज आला आणि मंत्री बच्चू कडू यांनी अपघाताच्या दिशेने वेगाने धाव घेतली.
यावेळी अपघातात पती पत्नी यांच्या हाताला,पायाला मार लागला होता. यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी पती-पत्नीची आस्थेवाईकपणे चौकशी करत घटनेचे गांभीर्य समजून आपली स्वतःची गाडी पती-पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी दिली. जखमी पती-पत्नीवर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मंत्री बच्चू कडू प्रवासात वारंवार चौकशी करीत होते. उपचारा नंतर जखमी पती पत्नी याना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्यात आले. मंत्री बच्चू कडू यांच्या तत्परतेमुळे पती-पत्नीचा जखमी पती-पत्नीला वेळेवर उपचार मिळाले. याबाबत दोघाही जखमी पती-पत्नीने मंत्री बच्चू कडू यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Web Title: Injured Husband And Wife Bachhu Kadu Put On Car Tratment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..