Mahua Moitra 
देश

Mahua Moitra: महुआ मोइत्रांच्या निलंबनाबाबत लोकसभा सरचिटणीसांना नोटीस, सुप्रीम कोर्टाने 2 आठवड्यात उत्तर मागवले

महुआ मोईत्रा यांच्या याचिकेवर आज (बुधवार) न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी लोकसभा महासचिवांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्चला होणार आहे.

Sandip Kapde

Mahua Moitra: तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) नेत्या महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून हकालपट्टी केल्याप्रकरणी आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लोकसभेच्या महासचिवांना दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. त्यांना २ आठवड्यांत उत्तर द्यावे लागेल.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महुआ मोईत्रा यांना निलंबित करण्यात आले होते. या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  त्यांच्या याचिकेवर आज (बुधवार) न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी लोकसभा महासचिवांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्चला होणार आहे.

अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले, त्यांना केवळ लॉगिन आयडी शेअर केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपानंतर लोकसभा अध्यक्षांनी आचार समितीची चौकशी केली ज्यामध्ये महुआ मोईत्रा दोषी आढळल्या. (Latest Marathi News)

खासदारकीतून हकालपट्टी केल्यानंतर महुआ मोईत्रा यांनाही ७ जानेवारीपर्यंत सरकारी निवासस्थान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाला त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपल्याला त्याच निवासस्थानी राहण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT