'एकदम गप्प रहा, 23 वर्षात असं कधी झालं नाही'; सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलावर भडकले

DY Chandrachud lost his temper सुप्रीम कोर्टात आज दुर्मिळ असा प्रसंग पाहायला मिळाला. देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड एका वकिलावर चिडल्याचं पाहायला मिळालं. एका याचिकेची लिस्टिंग करत असताना डी वाय चंद्रडूड यांनी वकीलाला चांगलेच फैलावर घेतले
dy chandrachud lost his temper angry in sc court room on advocates
dy chandrachud lost his temper angry in sc court room on advocates

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टात आज दुर्मिळ असा प्रसंग पाहायला मिळाला. देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड एका वकिलावर चिडल्याचं पाहायला मिळालं. एका याचिकेची लिस्टिंग करत असताना डी वाय चंद्रडूड यांनी वकीलाला चांगलेच फैलावर घेतले. तसेच तुम्ही कोर्टाला अशी धमकी देऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी फटकारले. (dy chandrachud lost his temper angry in sc court room on advocates)

सरन्यायाधीशांनी वकीलाला योग्य दृष्टीकोन ठेवून आणि सन्मानपूर्वक आपली गोष्ट समोर ठेवण्यास सांगितलं. वकील वरच्या आवाजात सरन्यायाधीशांची बोलत होते. त्यामुळे चंद्रचूड काहीशे निराश झाल्याचं दिसले. ते म्हणाले की, एक सेकंड, तुम्ही अगोदर हळू बोला. तुम्ही भारताच्या सर्वोच्च न्यायालययात बोलत आहात. तुमचा आवाज कमी ठेवा. अन्यथा मला तुम्हाला बाहेर काढावं लागेल.

dy chandrachud lost his temper angry in sc court room on advocates
अयोध्येतील रामजन्मभूमीबाबत प्रकरणाच्या निकालावर सर्व न्यायाधीशांचं एकमत कसं झालं? CJI चंद्रचूड यांनी दिली माहिती

वकील ज्याप्रकारे वर्तन करत होता ते सरन्यायाधीशांना आवडले नाही. ते म्हणाले की, तुम्ही सर्वसाधारणपणे कोणासमोर हजर होता. तुम्ही प्रत्येकवेळी अशाच प्रकारे कोर्टात मोठ्याने बोलता का? तुम्हाला कोर्टाची मर्यादा राखणे आवश्यक आहे. अगोदर तुम्ही आवाज कमी करा. मोठ्याने बोलून तुम्ही आम्हाला घाबरवू शकता असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. असं २३ वर्षांत कधी झालं नाही आणि असं माझ्या करियरच्या शेवटच्या वर्षांत देखील होणार नाही.

dy chandrachud lost his temper angry in sc court room on advocates
Adani-Hindenberg: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल, तपास SITकडे सोपवण्यास नकार

सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळाले. गप्प, बिलकूल गप्प राहा. तुम्ही आताच कोर्ट सोडून जा. तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही. मुख्य न्यायाधीशांच्या अशा रौद्र रुपामुळे वकिलाची घाबरगुंडी उडाली. त्यावेळी वकिलाने सरन्यायाधीशांना माफी मागितली. तसेत त्यानंतर वकिलाने विनम्रपणे आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलं.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com