Supreme Court on Gyanvapi Masjid esakal
देश

Gyanvapi Case: मुस्लिम पक्षाने ज्ञानवापीवर सर्वोच्च न्यायालयात केली 'अशी' मागणी, CJI चंद्रचूड यांनी लगेच दिला होकार

Gyanvapi Case: आज ज्ञानवापी प्रकरणावर आज (शुक्रवार) भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्ञानवापी प्रकरणावर मुस्लिम बाजूने आलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १९ डिसेंबरच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

Sandip Kapde

Gyanvapi Case: आज ज्ञानवापी प्रकरणावर आज (शुक्रवार) भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्ञानवापी प्रकरणावर मुस्लिम बाजूने आलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १९ डिसेंबरच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ज्यामध्ये उच्च न्यायालयाने मुस्लिम बाजूच्या पाच याचिका फेटाळल्या होत्या.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. ज्यामध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराशी संबंधित खटला कायम ठेवण्यायोग्य असल्याचे म्हटले होते. सुनावणी सुरू असताना मुस्लिम पक्षाने एक मागणी केली जी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.

सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी करणाऱ्या खटल्याचा विचार करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाबरोबरच (आदेश 7 नियम 11) ASI सर्वेक्षणाची परवानगीला दखील आव्हान देण्यात आले होते.

आज (शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना मुस्लिम पक्षाच्या वतीने हुजैफाने सांगितले की, हे जुने प्रकरण आहे. उर्वरित याचिकांची यादी करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचेही ऐकून घेतले पाहिजे. यानंतर हुजैफा अहमदी यांनी सुप्रीम कोर्टाकडे सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली.

यानंतर, CJI चंद्रचूड यांनी मुस्लिम बाजूच्या मागणीशी सहमती दर्शवली आणि सांगितले की आम्ही मूळ विवाद कायम ठेवण्यासाठी सर्व याचिका एकत्रितपणे ऐकू. यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. (Latest Marathi News)

ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची ही सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT