CJI Chandrachud: "आमदार, खासदारांवर २४ तास डिजिटल नजर ठेवा", सुप्रीम कोर्टात आली याचिका, CJI चंद्रचूड का संतापले?

CJI Chandrachud: सुप्रीम कोर्टाने आज (1 मार्च) 'पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी' खासदार/आमदारांच्या सर्व क्रियाकलापांवर डिजिटल नजर ठेवण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) याचिका फेटाळून लावली.
CJI Chandrachud
CJI Chandrachudesakal

CJI Chandrachud: सुप्रीम कोर्टाने आज (1 मार्च) 'पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी' खासदार/आमदारांच्या सर्व क्रियाकलापांवर डिजिटल नजर ठेवण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) याचिका फेटाळून लावली.

भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड या याचिकेवर सुनावणी करताना चांगलेच भडकले. खासदार आणि आमदारांवर डिजिटल पाळत ठेवण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी आज (शुक्रवार) याचिकेवर सुनावणी करताना 5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा इशारा दिला. मात्र नंतर कोणताही दंड न आकारता याचिका फेटाळली.

डॉ. सुरिंदर नाथ कुंद्रा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात खासदार आणि आमदारांच्या डिजिटल मॉनिटरिंगवरील याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले. ते म्हणाले, "आम्ही लोकांवर चिप्स लावू शकत नाही. ही काय याचिका आहे का?, आम्ही डिजिटल पद्धतीने पाळत कशी ठेवू शकतो? प्रायव्हसी नावाचीही एक गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला दंड भरण्यास सांगू. हा काळ जनतेचा आहे, आपल्या अहंकाराचा नाही."

CJI DY चंद्रचूड यांनी याचिकेच्या वस्तुस्थितीबद्दल असमाधान व्यक्त केले आणि लक्षात आणून दिले की निवडून आलेल्या प्रतिनिधींचे सतत डिजिटल मॉनिटरिंग करण्याचा आदेश गोपनीयतेच्या अधिकाराचे पूर्णपणे उल्लंघन करेल. त्यांनी याचिकाकर्त्याला गुणवत्तेवर सुनावणी करण्यापूर्वी ताकीद दिली की, जर न्यायालयाला हे प्रकरण लोकांच्या वेळेसाठी अयोग्य असल्याचे आढळले तर याचिकाकर्त्याला 5 लाख रुपये मोजावे लागतील.

सीजेआयने दंड ठोठावण्याचा इशारा दिल्यानंतर वकिलाने सांगितले की, "मी तुम्हाला पटवून देतो. हे पगारदार लोकप्रतिनिधी गैरवर्तन करू लागतात". यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उत्तर दिले की, "प्रत्येक खासदार आणि आमदारांच्या बाबतीत असे होत नाही. आम्ही अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही. असे झाले तर लोक म्हणू लागतील की आम्हाला न्यायाधीशांची गरज नाही आणि आम्हीच निर्णय घेऊ. जर कोणी पाकिटमारी पकडली तर आम्ही त्याला मारून टाकू."

CJI Chandrachud
Unseasonal Rain Alert : पुढील ३-४ तास महत्वाचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांना वादळी-वाऱ्यासह पावसाचा इशारा

या खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला पुढे विचारले की, तुम्ही जे युक्तिवाद करत आहात त्याचे गांभीर्य तुम्हाला जाणवते का? खासदार आणि आमदारांचेही वैयक्तिक आयुष्य असते. यावर वकिलाने उत्तर दिले की ज्यांना त्यांच्या गोपनीयतेची इतकी काळजी आहे. त्यांनी अशा नोकऱ्यांसाठी अर्ज करू नये. राज्यघटनेतील काही कलमे मूलभूत रचनेच्या विरोधात आहेत. (Latest Marathi News)

निवडून आलेल्या व्यक्तींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास नजर ठेवणे आणि ते फुटेज नागरिकांच्या स्मार्टफोनशी लिंक करणे ही त्यांची विनंती आहे, असे याचिकाकर्त्याने ठामपणे सांगितले. यावर चंद्रचूड म्हणाले,  तुम्ही काय वाद घालत आहात याचे गांभीर्य लक्षात आले आहे का? खासदार, आमदारांचेही खासगी आयुष्य असते, ते घरी त्यांच्या कुटुंबियांसोबत असतात."

यानंतर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही याचिका नोटीसवर ठेवली आहे. कोणताही दंड आकारत नाही, परंतु आम्ही ती नाकारतो. अशा प्रकारे खासदार आणि आमदारांवर डिजिटल नजर ठेवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

CJI Chandrachud
Reliance-Disney Merger : तब्बल 70,352 कोटी! रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणामुळे भारतीय क्रिकेटचं गणितच बदलणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com