after acquitted by supreme court accused in chhawla case committed another murder cji will hear case again  Sakal
देश

Supreme Court: पशूंना माणसाप्रमाणं हक्क देण्याची मागणी; SCनं फेटाळली याचिका; म्हटलं...

जनावरांनाही माणसांप्रमाणं सन्मानानं जगता यावं यांसह विविध मुद्दे या याचिकेत मांडले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पशूंना माणसाप्रमाणं सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळावा, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणीनंतर कोर्टानं शुक्रवारी ती फेटाळली. यासाठी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठानं राज्यघटनेचा दाखला दिला. (Supreme Court rejects PIL seeking rights for animals like human)

एका एनजीओच्या माध्यामातून ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पशूंसोबत झालेल्या क्रूर घटनांच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती. माणसामध्ये पशूंप्रती कोणतीही सन्मानाची भावना नाही. माणसं सहानुभूतीविरहित कसे असू शकतात? अशा घटना लोकांना चीड आणतात. त्यामुळं ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे की, सध्याचे कायदे पशूंबाबत गैरव्यवहार आणि क्रूरतपूर्ण वागणुकीपासून बचाव करु शकतात का? यामध्ये विविध राज्यातील क्रूरतेच्या विविध घटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

या याचिकेचा आधार पंजाब आणि हरयाणा हायकोर्टा तसेच उत्तराखंड हायकोर्टाच्या निकाल आहेत. या निकालांमध्ये पशूचं साम्राज्यातील सर्व जनावरांना कायदेशीर संस्थांच्या स्वरुपात मान्यता देण्यात आली आहे. पण ही याचिका फेटाळताना खंडपीठानं म्हटलं की, याचिकेत करण्यात आलेली मागणी ही संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत कोर्टाच्या विशेष अधिकार क्षेत्रात येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT