Madarsa Education Act esakal
देश

Madarsa Education Act: 16 हजार मदरशांवरील संकट टळले! सुप्रीम कोर्टाची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

Madarsa Education Act : उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण कायदा रद्द करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मदरसा संचालकांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

Sandip Kapde

Madarsa Education Act: अलाहाबाद उच्च न्यायालयाने मदरसा कायदा असंवैधानिक आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असल्याचे सांगत तो रद्द केला होता. दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मदरसा संचालकांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली. न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही या खंडपीठात समावेश होता.

मदरसा बोर्डाचे उद्दिष्ट नियामक आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मदरसा शिक्षण मंडळाची स्थापना धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे म्हणणे प्रथमदर्शनी योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारला मदरशातील विद्यार्थ्यांना सामान्य शाळांमध्ये हस्तांतरित करून त्यांना प्रवेश घेण्याचे आदेश दिले होते. सरकारला धार्मिक शिक्षणासाठी मंडळ स्थापन करण्याचा अधिकार नाही. याशिवाय, सरकार शालेय शिक्षणासाठी असे कोणतेही मंडळ स्थापन करू शकत नाही ज्यामध्ये केवळ विशिष्ट धर्म आणि त्याची मूल्ये शिकवली जातात, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले होते.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मदरसा अजीजिया इजाजुतुल उलूमचे व्यवस्थापक अंजुम कादरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी 22 मार्च रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने यूपी मदरसा कायदा 2004 असंवैधानिक ठरवून रद्द केला होता.

यानंतर योगी सरकारने यूपीमध्ये चालवल्या जाणाऱ्या सुमारे 16 हजार मदरशांची मान्यता रद्द केली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने मदरसा चालकांना मोठा दिलासा दिला आहे. मदरशांच्या निधीचा प्रश्नही वेळोवेळी उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT