Shoma Sen: भीमा कोरेगाव प्रकरणात प्रा. शोमा सेन यांना दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

प्रा. सेन यांच्यावर युएपीए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Shoma Sen
Shoma Sen

नवी दिल्ली : भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणातील आरोपी प्रा. शोमा सेन यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. प्रा. सेन यांच्यावर युएपीए कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याचे पुरावे नसल्यानं आपल्याला जामीन मंजूर व्हावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. (Supreme Court grants bail to Professor Shoma Sen accused in Bhima Koregaon case)

भीमा कोरेगावर-एल्गार परिषद प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याचा आणि भीमा कोरेगावर हिंसाचारात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी नागपूर विद्यापीठाच्या माजी प्राध्यापक शोमा सेन यांच्यासह १४ कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांवर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल झाला होता. ६ जबव २०१८ पासून त्या मुंबईच्या भायखाळा तुरुंगात अंडरट्रायल आहेत. (Latest Marathi News)

Shoma Sen
Vasant More: ससूनमध्ये उंदीर चावल्यानं झाला होता रुग्णाचा मृत्यू, वसंत मोरेंनी डीनला दिला पिंजरा भेट

या प्रकरणातील इतर आरोपींपैकी वकील सुधा भारद्वाज, कवी-लेखक पी. वरावरा राव, नागरी हक्क कार्यकर्ते डॉ आनंद तेलतुंबडे, कामगार कार्यकर्ते वर्नन गोन्साल्विस, वकील अरुण फरेरा यांचा समावेश आहे. फरेरा यांना आतापर्यंत जामीन मिळाल होता. आणखी एक सहआरोपी, आदिवासी हक्क कार्यकर्ते आणि फादर स्टॅन स्वामी यांचाही समावेश होता. सात महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर तिथेच जून 2021 मध्ये कोविडमुळं त्यांचं निधन झालं.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com