देश

योगींना मत दिलं नाही तर घरे पाडू; आमदाराच्या वक्तव्यावर ECची नोटीस

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) तेलंगणातील भाजपचे आमदार टी राजा सिंग यांना त्यांच्या एका धमकी देणाऱ्या व्हिडीओबद्दल नोटीस बजावली आहे. जर तुम्ही भाजपला मत दिलं नाही तर तुम्हाला जेसीबी आणि बुलडोझर्सना सामोरी जावं लागेल, अशी थेट धमकी त्यांनी मतदारांना दिली होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका लोकप्रतिनिधीने याप्रकारले मतदारांना धमकावणं चुकीचं असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने या व्हिडीओची दखल घेत त्यांना त्याबाबत 24 तासात खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. (T Raja Singh Uttar Pradesh)

टी राजा सिंग यांनी जो व्हिडीओ ट्विट केला होता, त्यामध्ये ते म्हणाले होते की, जे लोक भाजपला मत देत नाहीत, त्यांना मी सांगू इच्छितो की, योगीजींनी हजारोंच्या संख्येने जेसीबी आणि बुलडोझर्स मागवले आहेत, जे यूपीच्या दिशेने निघाले आहेत. निवडणुकीनंतर जे जे लोक योगींना पाठिबां देणार नाहीत, त्या सर्व भागांना शोधण्यात येईल. आणि तुम्हाला माहितीय ना की जेसीबी आणि बुलडोझर्स कशासाठी वापरात येतात? तुमची घरे पाडली जातील. अशी खुली धमकीच देण्यात आली आहे.

पुढे ते म्हणाले की, तेंव्हा मी यूपीच्या जनतेला त्या गद्दार लोकांना सांगू इच्छितो, ज्यांना वाटतं की, योगी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत, की जर यूपीमध्ये रहायचं असेल तर योगी योगी म्हणावचं लागेल. नाहीतर तुम्हाला यूपी सोडून पळून जावं लागेल. फिर एक बार, योगी बाबा की सरकार, असं त्या व्हिडीओत स्पष्टपणे धमकी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT