Bangladeshi Bangalore Police esakal
देश

Karnataka NIA : बंगळुरात तब्बल 10 हजार बांगलादेशी बेकायदेशीर स्थायिक; NIA च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

एनआयएने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास अधिक तीव्र केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आरोपींनी बांगलादेशी स्थलांतरितांना बेकायदेशीरपणे आणून दरोडा टाकण्याचा कट रचल्याचा संशय आहे.

बंगळूर : बंगळूरसह विविध ठिकाणी १० हजारांहून अधिक बांगलादेशी (Bangladeshi) स्थलांतरित बेकायदेशीरपणे स्थायिक झाल्याची धक्कादायक बाब राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे.

अलीकडेच बांगलादेशी स्थलांतरितांना बेकायदेशीरपणे शहरात आणणाऱ्या ११ जणांना अटक करून त्यांची चौकशी एनआयए अधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी असे आढळून आले की, १० हजारांहून अधिक स्थलांतरित बांगलादेशी बंगळूरसह विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे येऊन स्थायिक झाले आहेत.

त्यानंतर एनआयएने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास अधिक तीव्र केला आहे. दोन दिवसांपूर्वी एनआयए अधिकाऱ्यांनी बंगळूर आणि त्याच्या बाहेरील भागात राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांवर छापे टाकले आणि त्यांना बेकायदेशीरपणे शहरात आणणाऱ्या ११ लोकांना अटक केली. आतापर्यंतच्या तपासादरम्यान दहा हजारांहून अधिक लोक बेकायदेशीररीत्या आल्याचे समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या चौकशीत मास्टरमाईंड झाकीर हुसेन यानेच ही माहिती दिली आहे. त्यांच्या सूचनेनुसार त्यांना अनधिकृतपणे शहरात आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एनआयएच्या छाप्यादरम्यान आरोपी झाकीर हुसेन फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी तपास तीव्र केला आहे.

४४ ठिकाणी छापेमारी

तीन दिवसांपूर्वी एनआयए अधिकाऱ्यांनी कर्नाटकसह १० राज्यांत ४४ ठिकाणी छापे टाकून अटक केलेल्यांकडून मोबाईल, सीमकार्ड, पेन ड्राईव्ह, कागदपत्रे, आधारकार्ड आणि रोख रक्कम जप्त केली. त्याने बनावट आधारकार्ड बनवून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले. शहरातील सोलादेवनहळ्ळी, केआरपूर, बेळंदूर, बैयप्पनहळ्ळी, दोड्डाबळ्ळापूर, होस्कोटे, आनेकल यासह १५ ठिकाणी हा छापा टाकला.

आधारकार्ड सापडले

एनआयएच्या छाप्यात बहुतांश बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांकडे आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र सापडले. त्यामुळे हे ओळखपत्र कोणी बनवले आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध एनआयए घेत आहे.

दरोडा आणि लुटमारीचा कट

आरोपींनी बांगलादेशी स्थलांतरितांना बेकायदेशीरपणे आणून दरोडा टाकण्याचा कट रचल्याचा संशय आहे. काहींना दरोडा टाकण्याचे प्रशिक्षणही दिल्याचे सांगण्यात येते. काही महिलांना वेश्याव्यवसायात आणण्याचाही डाव होता. या संदर्भात केवळ आरोपींच्या प्लॅनबद्दल बोलत नसून, त्यामागे असलेल्यांची नावे समोर येत असून, तपासाला गती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Water Supply: ठाणे जिल्ह्यात जलसंकटाचे सावट! तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागात कधी पाणीबाणी?

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

SCROLL FOR NEXT