Karnataka Politics : लिंगायत मतदार भाजपकडं वळणार? 'या' बड्या नेत्याच्या सुपुत्राला 'प्रदेशाध्यक्ष' करुन भाजपनं खेळला वेगळाच डाव

गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नलिनकुमार कटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
Karnataka Politics Former CM BS Yediyurappa son BY Vijayendra
Karnataka Politics Former CM BS Yediyurappa son BY Vijayendraesakal
Summary

लिंगायत समाजाचा भाजपला पाठिंबा राहावा यासाठी विजयेंद्र यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

बंगळूर : राज्याच्या राजकारणात (Karnataka Politics) अनपेक्षित घडामोडी घडत असताना माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (B. S. Yediyurappa) यांचे पुत्र आणि शिकारीपूरचे आमदार बी. वाय. विजयेंद्र (B. Y. Vijayendra) यांना दिवाळी भेट देताना भाजप हायकमांडने (BJP High Command) प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली.

Karnataka Politics Former CM BS Yediyurappa son BY Vijayendra
Operation Hasta : JDS चे आमदार फुटणार? 'ऑपरेशन हस्त'पासून वाचण्यासाठी 19 आमदारांना हलविलं हासनच्या रिसॉर्टवर!

शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ४७ वर्षीय विजयेंद्र यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणारा आदेश जारी केला. यापूर्वी ते भाजपचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नलिनकुमार कटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याबाबत मोठी उत्सुकता होती.

Karnataka Politics Former CM BS Yediyurappa son BY Vijayendra
डी. के. शिवकुमारांनंतर खासदार सुरेश यांनी घेतली जारकीहोळींची भेट; कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता?

लिंगायत समाजाचा भाजपला पाठिंबा राहावा यासाठी विजयेंद्र यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. आता विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याची उत्सुकता आहे. निवडणुकीनंतर प्रदेश भाजपचे नेतृत्व कोणाकडेच नव्हते. भाजपने युवा नेते विजयेंद्र यांच्याकडे भाजप नेतृत्व सोपवले आहे.

२०२० पासून ते कर्नाटकात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. याआधी त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कर्नाटक युनिटचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. विजयेंद्र हे पेशाने वकील आहेत आणि त्यांचे भाऊ बी. वाय. राघवेंद्र हे शिमोगा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Karnataka Politics Former CM BS Yediyurappa son BY Vijayendra
आमदारकी पणाला लावली, पण पाटलांनी करुन दाखवलंच! काळम्मावाडीचं पाणी थेट पुईखडी केंद्रात, कोल्हापूरकरांचं स्वप्न झालं पूर्ण

विजयेंद्र यांचे हार्दिक अभिनंदन. मला आशा आहे की, तुमच्या अध्यक्षपदाच्या काळात पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल आणि अधिक सामर्थ्यशाली म्हणून उदयास येईल.

-बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com